Amit Thackeray : विद्यार्थ्यांनो माझ्याशी थेट संपर्क करा

Amit Thackeray यांचे संपर्क मिशन नाशिकमध्ये जोरात...
Amit Thakrey at Igatpuri
Amit Thakrey at IgatpuriSarkarnama
Published on
Updated on

घोटी : विद्यार्थी (Students) हेच देशाचे (India) उज्वल भविष्य आहे. विद्यार्थीदशेतील त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी मी आलो आहे. विद्यार्थी मित्रांनी कधी काही अडचणी आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thakrey) यांनी आज केले. (Amit Thakrey get grand wel come at nashik`s Border)

Amit Thakrey at Igatpuri
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

टाके-घोटी (इगतपुरी) येथील ग्रॅण्ड परिवार सभागृहात श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. परिसरातील पाच महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले.

Amit Thakrey at Igatpuri
Nashik News: भाजप हा सत्तापिपासू; त्याने जनतेवर महागाई लादली!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यात महासंपर्क अभियान राबवले जात असुन या पाश्र्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा मनविसे पुनर्बांधनी दौऱ्यासाठी नाशिक जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते.नाशिक जिल्हयाचे प्रवेशव्दार समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत आज अमित ठाकरे यांचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांनी ढोलताषाच्या गजरात जोरदार जंगी स्वागत केले.

यावेळी एसएमबीटी महाविद्यालय, केपीजी महाविद्यालय, महात्मा गांधी महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या बरोबर अमित ठाकरे यांनी संवाद साधला.यावेळी अमित ठाकरे यांनी कॉलेजच्या विद्यार्थीच्या अडी अडचणी समजुन घेत सवांद साधुन मार्गदर्शन केले.

यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, योगेश शेवरे, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, तालुकाध्यक्ष शत्रूगन भागडे, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रताप जाखेरे, मूलचंद भगत, भोलानाथ चव्हाण, आत्माराम मते, गणेश गायकर, पूनम राखेचा, राजू राखेचा, निलेश जोशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com