Narahari Zirwal News: राज्यात गुटखा आणि सुगंधी पाणमसाला यावर बंदी आहे. मात्र त्याची चोर वाटेने जोरदार उलाढाल सुरू आहे. त्याची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी घेतली आहे.
तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते (कै.) आर. आर. पाटील उर्फ आबा यांनी गुटखा विरोधात कठोर पाऊल उचलले होते. त्यांच्या या निर्णयाने पॉवरफुल गुटखा लॉबी हादरली होती. आता त्यात आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेत आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी पान मसाला यामुळे तरुण पिढी व्यसनाकडे वळाली आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो.
हे प्रकार रोखण्यासाठी अन्न व औषध मंत्र्यांनी एक पाहून पुढे टाकले आहे. यानिमित्ताने (कै) आर. आर. पाटील यांनी कठोर निर्णय घेतला होता. त्याच वाटेने जाण्याचा निर्णय मंत्री झिरवाळ यांनी घेतला आहे.
या संदर्भात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. बंदी असूनही गुटखा आणि सुगंधित पान मसाला विक्री सुरूच आहे. त्यामुळे तरुण पिढी आणि नागरिक व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी जालीम उपाय केला आहे.
राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आता त्यात मकोका कलम लावण्यात येणार आहे.
विशेषता गुजरात आणि परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि प्रतिबंधित पानमसाला आयात केला जातो. चोरट्या मार्गाने ही वाहतूक सर्रास सुरू आहे. यावर नियंत्रण आणण्यात विविध यंत्रणा पूर्णतः यशस्वी झालेल्या नाहीत. विद्यार्थी आणि युवा पिढीवर त्याचा परिणाम झाला आहे.
गुटख्याच्या विळख्यातून विद्यार्थी आणि तरुणांना वाचविण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. त्याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत. कठोर कारवाई करून गुटखा विक्री रोखण्यासाठी पावले टाकण्यात येतील असेही मंत्र्यांनी जाहीर केले.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.