Ahmednagar Now Ahilyaanagar : लोकप्रिय निर्णयांचा धडाका; अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरावर शिक्कामोर्तब, आता...

Ahmednagar name change to Ahilyanagar has been approved by the Modi government at the Centre : अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली.
Ahilyaanagar
AhilyaanagarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक घटकाला खूश करण्यासाठी राज्यातील आणि केंद्रातील महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरावर केंद्रातील मोदी सरकारने शिक्कामोर्तब केलं आहे.

या नामांतराच्या निर्णयाचे स्वागत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आले. भाजप नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. आता यापुढे अहमदनगर जिल्हा 'अहिल्यानगर' म्हणून ओळखला जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे पुण्याश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी होत होती. अनेक वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याच्या मागणीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शिक्कामोर्तब झाले. नामंतराच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा 'अहिल्यानगर' म्हणून ओळखला जाणार आहे. नामांतराच्या या निर्णयाचे भाजप (BJP) नेते, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीदिनास 300 वर्ष पूर्ण होत असतानाच, हा निर्णय होणे ही एक ऐतिहासिक घटना असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Ahilyaanagar
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : विखे-थोरातांमध्ये जुंपली; थोरातांनी आव्हान देताच, मंत्री विखेंनी मक्तेदारीवरच...

गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत होती. चोंडी (ता. जामखेड) येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अहमदनगर जिल्ह्याला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही नामांतराच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्याचे विनंतीपत्र दिले होते. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर नावाला कोणतेही हरकत नसल्याचे राज्य आणि जिल्हा प्रशासनाला कळविले होते.

Ahilyaanagar
BJP Politics: भाजप आमदार चव्हाण यांचे उन्मेष पाटलांना आव्हान, "१० वर्षात काय दिवे लावले"


केंद्र सरकारने अहिल्यानगर नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.नामांतर होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात आले. हा निर्णय होण्यासाठी योगदान देता आले याचा आनंद आहे. महायुती सरकारने दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती केल्याचाही आनंद आहे, असे राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं.

नामांतरावर उच्च न्यायालयात सुनावणी

अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावार शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्याचं संपूर्ण श्रेय महायुतीने घेण्यास सुरवात केली आहे. यात भाजप आघाडीवर आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी निर्णयाचं पहिलं स्वागत केलं आहे. परंतु हा निर्णय वादात सापडण्याची चिन्हं आहे. राज्य सरकारने नामांतरचा निर्णय 13 मार्च रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होता होता. हा प्रस्ताव त्यांनी केंद्राकडे पाठवला होता.अहमदनगरचे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे. यातच राज्यापाठोपाठ केंद्राने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख आणि पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून यावर सुनावणी सुरू आहेत. असतानाच केंद्राने नामांतराचा निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com