Congress agitation at Nashik
Congress agitation at NashikSarkarnama

मोदी, योगी हे तर "जनरल डायरचे वंशज"

उत्तरप्रदेश मधील शेतकरी हत्याकांडांच्या निषेधार्थ नाशिक शहर कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
Published on

नाशिक : उत्तरप्रदेश मधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri of Uttar Pradesh) येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Centre minister Ajay Mishra`s son) यांच्या मुलाने केलेल्या शेतकरी हत्याकांड (Farmers massacre) घडले. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Congress leader Priyanka Gandhi detain while going to meet Farmers) यांना अटक करण्यात आली. या घटना म्हणजे ब्रिटीश जनरल डायर (This Incidents like General Dyer`s act) यांनाही मागे टाकणाऱ्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे एकविसाव्या शतकातील जनरल डायर आहेत, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

Congress agitation at Nashik
...तर माझी मालमत्ता गिरीश महाजनांना दान करेन!

शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ आज शहर कॉंग्रेस भवनच्या आवारात शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी योगी मोदी सरकार मुर्दाबाद, किसान विरोधी नरेंद्र मोदी, प्रियांका गांधी यांना अटक करणाऱ्या योगी सरकारचा निषेध असो, शेतकरी हत्याकांड करणाऱ्या योगी सरकारचा निषेध असो अशा तीव्र घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरद आहेर म्हणाले की, गेल्या एक वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर व देशभरात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहे. काल उत्तरप्रदेशातील लखीमपुर येथे शांततापूर्ण आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घालून आठ शेतकऱ्यांची हत्या केली. भारती स्वातंत्र्याच्या अमृत महोस्तवी वर्षात पुन्हा एकदा मोदी आणि योगीच्या "जनरल डायरचे वंशज" सत्तेवर आहेत, अशी स्थिती व त्यांचे वर्तन आहे. या घटनेने इंग्रज राजवटीची आठवण करून दिली आहे. मोदी आणि योगी भाजप सरकारचा शेतकरी विरोधी अमानवीय चेहरा यातुन जगासमोर आला आहे.

Congress agitation at Nashik
शासनाने उत्तीर्ण उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये!

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या पिडीत शेतकरी व त्यांच्या पिडीत कुटुंबियांना भेटायला जात असताना पोलीस बळाचा वापर करून योगी सरकारने हरगाव येथे त्यांना अटक केली. हे कृत्य करून शेतकरी आणि विरोधकांचा आवाज ते दाबून टाकत आहेत. शेतकरी हत्याकांड करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न मोदी, योगी, भाजपा सरकार करत आहे. गप्प रहा नाहीतर चिरडून टाकू असा संदेश मोदी, योगी, भाजपा सरकार देत आहे. त्यांची ही भूमिका विनाश काले विपरीत बुध्दी अशी आहे. मोदी, योगी, भाजपचा अहंकार आणि मस्ती शेतकरी व जनता लवकरच चिरडून टाकेल. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावी. कृषी कायदे मागे घेईपर्यत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभा आहे.

या आंदोलनात आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार प्रताप वाघ, नगरसेविक वत्सला खैरे, नगरसेवक राहुल दिवे, बबलू खैरे, दिनेश निकाळे, विजू पाटील, कैलास कडलग, आकाश घोलप, अण्णा मोरे, ज्युली डिसुझा, डॅा सुचेता बच्छाव, गुलाम शेख, दर्शन पाटील, अविनाश गांगुर्डे, सोमनाथ मोहिते, गुडडी आप्पा, संतोष नाथ, अरुण दोंदे, रामकीसन चव्हाण, राजकुमार जेफ, कैलास महाले, इसाक कुरेशी, फारूक कुरेशी, भारत पाटील, सचिन दीक्षित, लक्ष्मण धोत्रे, तौफिक शेख, इम्रान अन्सारी, प्रमोद धोंडगे, कीर्ती जाधव, ज्ञानेश्वर चव्हाण, आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com