Nashik Politics: गोडसे, बोरस्तेंच्या स्पर्धेत कोकाटेंची एन्ट्री, उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

Nashik Constituency 2024 : आमदार कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांना विधानसभा निवडणुकीचे लागले आहेत. त्यामुळे सीमांतिनी कोकाटे यांना सिन्नर विधानसभा निवडणुकीत उमेदवार केल्यास आमदार कोकाटे यांचे भवितव्य काय? अशी चर्चा आहे.
Nashik constituency 2024
Nashik constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: नाशिक मतदारसंघावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. त्यांची स्पर्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी आहे. या स्पर्धेत उमेदवार कोण यावरून गेले दोन आठवड्यांपासून वाद सुरू आहे.

नाशिक मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्याशी याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांची स्पर्धा आहे. या वादातून उमेदवार कोण हे सतत लांबणीवर पडत आले आहे. त्यामुळे गेले दोन आठवडे कार्यकर्तेदेखील गोंधळलेले आहेत. या गोंधळात आता नवी भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांत अचानक आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव चर्चेत आले आहे.

महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तीन आठवड्यांपासून त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला आहे. त्यांनी सबंध मतदारसंघ पिंजून काढला आहे.

सिन्नर मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाजे आणि कोकाटे या दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोकाटे यांच्या मदतीसाठी एकत्र येताना दिसत आहेत. त्यात कोकाटे यांच्याशी जवळीक असलेल्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.

त्यामुळे कोकाटेंचे निकटवर्तीय चिंतित आहेत. त्यावर तोडगा म्हणून हे कार्यकर्ते दूर जाऊ नये, यासाठी कोकाटेंनी लोकसभा लढवावी, असा आग्रह त्यांचे समर्थक करीत आहेत. कोकाटे यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे.

आमदार कोकाटे यांच्या कन्या सीमांतिनी कोकाटे यांना विधानसभा निवडणुकीचे लागले आहेत. त्यामुळे सीमांतिनी कोकाटे यांना सिन्नर विधानसभा निवडणुकीत उमेदवार केल्यास आमदार कोकाटे यांचे भवितव्य काय? अशी चर्चा आहे. दुसरीकडे कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांना माणिकराव कोकाटे आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास ते पाचव्यांदा आमदार होतील. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळू शकेल.

Nashik constituency 2024
Kolhe Vs Adhalarao: हिंमत असेल तर या; कोल्हेंचे आढळरावांना खुलं चॅलेंज

या जर चर्चा राजकारणात माणिकराव कोकाटे यांचे निकटवर्तीय गुंतले आहेत. महायुतीची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. त्यात कोकाटे यांना चांगली संधी होती. मात्र, त्यांनी लोकसभेसाठी नकार दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाला नाशिक मतदारसंघ मिळाल्यास राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उमेदवारीसाठी माघार घेतली आहे. त्यामुळे आमदार कोकाटे हे पर्यायी उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. या संदर्भात आमदार कोकाटे काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com