Pune News: मनसेतील नाराज नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी राजीनामा देऊन दहा मिनिटेही झाली नाहीत, तेवढ्यात वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार की, उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ देणार याची चर्चा सुरू आहे, तेव्हाच मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार की, नंदनवनात जाऊन धनुष्यबाण उचलणार यावरून अटकळी बांधल्या जात आहेत. अशातच खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) वसंत मोरेंना राजकीय सल्ला देत वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये, अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. परिणामी वसंत मोरे भाजपत जाऊ शकतात का, याही चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, पुढच्या दोन-तीन दिवस शांत राहून भूमिका घेण्याचा पवित्रा वसंत मोरेंनी घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
फेसबुकवर पोस्ट करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अर्थात तात्या मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.“अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोटोसमोर हात जोडून उभे असलेले वसंत मोरे असा फोटो पोस्ट केला आहे. “अखेरचा जय महाराष्ट्र… साहेब मला माफ करा” लिहिले आहे. एका फोटोत ते राज ठाकरेंच्या फोटोसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत, तर त्यांनी या पोस्टमध्ये आपले राजीनाम्याचे पत्रही प्रसिद्ध केले आहे. “पक्ष संघटनावाढीसाठी गेली 18 वर्षे सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो, परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे,” अशी खंत त्यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
राजीनाम्यानंतर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. आपली भूमिका मांडताना त्यांना रडू कोसळले. शहरातील पक्षातील नेत्यांच्या वागणुकीमुळे आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचा आरोप त्यांनी केला. वरिष्ठांकडे तक्रार करूनही आपली दखल घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.