Sanjay Raut : कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय; संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका

'शिंदे गटात सध्या काय सुरू आहे हे मला माहितीय आणि लवकरच त्याचा स्फोट होईल'
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : ''कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज शिंदे- फडणवीस सरकारच्या तोंडावर थुंकतोय. पण महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री म्हणतात आम्ही तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. मग आता करा ना क्रांती. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का? असं म्हणत मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला?'' असा सवाल खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलाय.

सध्या महाराष्ट्र-कर्नाटकच्या (Maharashtra Karnataka Border Issue) सीमाप्रश्नाचा वाद चर्चेत आहे. त्यातच आज कर्नाटककडून जतमध्ये धरणाचं अतिरिक्त पाणी सोडण्यात आलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीच्या (Sangli ) जतमधील ४० गावांवर दावाही केलाय. या पार्श्वभूमीवर शिंदे- फडणवीस सरकारवर राऊतांनी घणाघाती टीका केली.

Sanjay Raut
Kalyanrao Kale : राष्ट्रवादीच्या काळेंना दणका : ‘सीताराम’च्या शेअर्सचे ४१ कोटी परत देण्याचा सेबीचा आदेश

राऊत म्हणाले, ''मी सध्या खासदार असलो तरी त्याआधी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा असल्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात सध्या काय सुरू आहे हे मला माहितीय आणि लवकरच त्याचा स्फोट होईल. वैजापूरच्या आमदाराला लोकांनी गावातून बाहेर काढले. सगळीकडे हीच परिस्थिती आहे. पण त्यांचे सरकार असल्यामुळे त्यांना सुरक्षा मिळाली. त्यामुळे या आमदारांचे भविष्य मला काही चांगले दिसत नाही'', असं राऊत म्हणाले.

''शिवसेनेतून ४० आमदार गेले असले तरी पक्ष जमिनीवर आहे. काही आमदार सोडून गेले तर शिवसेना संपली असं होत नाही. महाराष्ट्रात आत्ता निवडणुका घेतल्या तरी आम्ही जिंकू. सध्या महापालिकांच्या निवडणुका ह्या भीतीपोटी टाळल्या जात आहेत. पण शिवसेना नव्या चिन्हावर देखील विजयी होईल. एवढंच नाही तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार पुन्हा येणार आहे'', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut
Chandrakant Patil म्हणाले, अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाबाबत आता माघार नाही...

''शिवसेना सोडून गेलेल्या आमदार, खासदारांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का लागला आहे. ज्याप्रकारे 'दिवार' चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असं लिहिलं होतं, तसंच उद्या यांची मुले हातावर गद्दार नोंदवून घेतील. तसंच या मुलांना आणि नातेवाईकांना लोकं गद्दारांचे नातेवाईक म्हणतील'', अशी टीका राऊतांनी केली.

हेमंत गोडसे पुन्हा निवडून येणार नाही...

''शिवसेना (Shiv Sena) हाच खरा चेहरा आहे. शिवसेनेच्या चार अक्षरांमध्ये खरी ताकद आहे. लाखो शिवसैनिकांच्या जीवावर खासदार, आमदार निवडून येतात. मात्र गट निर्माण करून नाही. हेमंत गोडसे (Hemant Godse) पुन्हा निवडून येणार नाही. त्यांचे डिपॉझिट वाचले तरी पुष्कळ,'' असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com