NAFED Corruption : नाफेडच्या भ्रष्टाचाराचा कळस; महाराष्ट्राला टाळत परराज्यातून सडक्या कांद्याची खरेदी?

NAFED Onion Procurement : केंद्र शासनाच्या या संस्थांनी महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध असताना घोटाळा केला. परराज्यातील निकृष्ट आणि खराब कांद्याची खरेदी करण्यात आली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश समन्वयक कुबेर यांनी केला.
NAFED Onion Procurement | NCCF Corruption | Maharashtra Farmers
NAFED Onion Procurement | NCCF Corruption | Maharashtra FarmersSarkarnama
Published on
Updated on

Nashik onion corruption : नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्र शासनाच्या संस्थांवर कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत. यासंदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप थेट संचालकांकडून झाला होता. त्यामुळे नाफेडच्या कारभाराचा फटका आता थेट शेतकऱ्यांना बसत आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ संस्थेने जुलै महिन्यात खरेदी केलेल्या कांद्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे आणि भास्करराव भगरे यांनी पणन मंत्र्यांना पत्र लिहिले. जुलै महिन्यातील नाफेडच्या गोदामातील सडक्या कांद्याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.

आता या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश समन्वयक कुबेर जाधव यांनी गंभीर आरोप केला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थेने कांदा खरेदीत गर व्यवहार केला आहे. त्याची झळ थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसली. केंद्र शासनाच्या या संस्थांनी महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण कांदा उपलब्ध असताना घोटाळा केला. परराज्यातील निकृष्ट आणि खराब कांद्याची खरेदी करण्यात आली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जाधव यांनी केला.

NAFED Onion Procurement | NCCF Corruption | Maharashtra Farmers
Someshwar Sugar Factory : सोमेश्वरने अजितदादांची प्रथा ठेवली कायम! उसाला FRPपेक्षा जास्त दर : टनाला भुवया उंचावणाऱ्या दराची घोषणा

नाफेड संस्थेच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. गतवर्षी नाफेडचे अध्यक्ष आणि संचालकांनी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे नाशिकच्या चार अधिकाऱ्यांना बडतर्फ करून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कांदा बाजारात विक्रीसाठी आला.

NAFED Onion Procurement | NCCF Corruption | Maharashtra Farmers
Dombivli train Accident : डोंबिवलीत लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलीच्या अपघाताला धक्क्कादायक वळण, पोस्टमार्टेममधून समोर आली वेगळीच माहिती

मात्र हा कांदा खरेदी करताना त्याला ए ग्रेड असे निकष लावण्यात आले. त्यानंतर अचानक या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचे घोषित झाले. त्यात निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी झाला. त्यामुळे नाफेडच्या खरेदी बाबत पुन्हा एकदा संशय व्यक्त होत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायी ठरण्याऐवजी नुकसानकारक काम नाफेडकडून होत असल्याची टीका होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com