Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीबाबतचा अजितदादांचा दावा पवारांनी फेटाळला; भाजपसोबत जाण्याची इच्छा...

Sharad Pawar on Ajit Pawar: ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी झाला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
sharad pawar ajit pawar
sharad pawar ajit pawarsarkarnama

पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती, भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मी मात्र अमित शाह यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेचा शपथविधी झाला, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले आहे. "भाजपसोबत जाण्याचा आमची इच्छा नव्हती आणि कधीही नसणार," असे पवारांनी सांगितले .

2019 च्या निवडणूक निकालानंतर राज्यात सत्तास्थापन होण्यापूर्वी आमची (राष्ट्रवादी काँग्रेस) एका बड्या उद्योपतींच्या घरी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबतही निर्णय झाला होता. प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत होते. पण शरद पवार मुंबईत आल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला, मी शब्द पाळणारा आहे. मला अमित शाह (Amit Shah) यांचा फोन आला, त्यानंतर मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला होता.

शरद पवार अहमदनगर दौऱ्यावर आहेत. नगरमध्ये नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी पवार कालपासून मुक्कामी आहेत. आज सकाळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

दहा वर्षे शरद पवारांनी काय केले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी शाहांना सुनावले. दहा वर्षे सत्तेत ते होते, आम्ही नाही. त्यांनी सत्तेत असताना दहा वर्षे काय केले, असा सवाल शरद पवारांनी केला. "2014 ते 2024 पर्यंत सत्तेत होते. ते मला जाब विचारतात. मग दहा वर्षे तुम्ही सत्तेत आहात. तुम्ही काय केलं हे सांगायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही काय केलं हे जगाला माहिती आहे," असा टोला पवारांनी लगावला.

sharad pawar ajit pawar
Thorat Vs Vikhe: गांधी मैदानातून पवारांच्या साक्षीने थोरातांनी मंत्री विखे यांच्या दहशतीला दिले आव्हान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, रामटेक, चंद्रपूरसह देशभरातील 21 राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील 102 लोकसभा मतदारसंघात काल, शुक्रवारी मतदान झाले. याच्या कमी झालेल्या टक्केवारीबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली.

'आम्ही लोकसभेच्या दहा जागा लढवत आहाेत. विधानसभेत अधिक जागा लढवणार आहोत. मागील वेळी चार जागा होत्या, या वेळी वाढ झाल्याचे दिसेल. भाजपचा चारशे पारचा नारा चुकीचा वाटतो. कारण या निवडणुकीत एवढ्या जागा येणार नाहीत," असे शरद पवार म्हणाले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com