Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विखे दिल्लीत ॲक्टिव्ह; शाहांची घेतली भेट

Maharashtra Politics: केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्णयानुसार ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे.
Amit Shah, Sujay Vikhe
Amit Shah, Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Nagar News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे दिल्ली चांगले ॲक्टिव्ह झाले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. या भेटीत आगामी निवडणुका आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे दिल्लीतील वरिष्ठ केंद्रीय नेत्यांचे लक्ष खासदार विखेंनी वेधले. यात विशेष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खासदार विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली.

अमित शाह यांच्या भेटीत कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी सुजय विखे यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कांद्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलावीत. तसेच नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीदेखील खासदार विखेंनी केली. याशिवाय खासदार विखे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडेदेखील लक्ष वेधले. यावर अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शाह यांनी दिल्याची माहिती विखे यांनी दिली. Lok Sabha Election 2024

Amit Shah, Sujay Vikhe
EC Decision on NCP: राष्ट्रवादी आमचीच; कर्जतमध्ये आनंदोत्सव, तर नगरमध्ये सन्नाटा

केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्णयानुसार ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे. कांद्याच्या वाढत्या भावावरून नियंत्रणासाठी या निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून त्यावेळी सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे शेतकरी आणि कांदा व्यापारी यामध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटलेले आहेत. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील कांदा लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला होता. काही ठिकाणी आंदोलनेदेखील करण्यात आली होती. आजही कांदा उत्पादक शेतकरी निर्यात बंदीवरून आक्रमक आहे.

यातच खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय अमित शाह यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली आहे. यावर शाह यांनी सकारात्मकता दाखवली असली तरी ते कधी निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत घातली आहे. त्याअगोदरच निर्णय होईल का?, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. खासदार विखे यांनी या निर्णयासाठी आपण पाठपुरावा करत राहू, असे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com