Nagar Urban Bank : आठवा नंबर कुणाचा? नगर अर्बन बँक गैरव्यवहारप्रकरणी अटकसत्र सुरू

Bank Fraud : चार फरार संचालकांचा शोध सुरू, बँकेचे अधिकारीही रडारवर
Nagar Urban cooperative bank
Nagar Urban cooperative bankSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Bank Fraud News :

नगर अर्बन बँकेत गैरव्यवहार करून बँक बुडवण्यास कारणीभूत ठरलेले माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे आणि अनिल कोठारी असे तिघे जण गजाआड गेले आहेत. आता माजी अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल, माजी उपाध्यक्ष शैलेश मुनोत आणि माजी संचालक अजय बोरा आणि दिनेश कटारिया या चौघांचा शोध सुरू आहे.

नगर जिल्ह्यात नगर अर्बन बँकेचे गैरव्यवहार (Nagar Urban Co-operative Bank Ltd) प्रकरण चांगलेच गाजले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर बँकेचे आजी-माजी वरिष्ठ अधिकारी नवीन गांधी, सतीश शिंगटे, सतीश रोकडे, राजेंद्र डोळे व महादेव साळवे, तसेच मोठ्या रकमांच्या कर्जदारांचीही चौकशी बाकी असल्याने अर्बन बँकविश्वात खळबळ उडाली आहे.

Nagar Urban cooperative bank
Ahmednagar Bank Scam : नगर अर्बन बँकेच्या 'या' बड्या आरोपीला बेड्या

नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारियाला (Ashok Kataria) 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिल्यामुळे बँकेतील गैरव्यवहाराच्या (Bank Fraud) अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. बँकेतील गैरव्यवहाराचा आकडा 291 कोटी 25 लाखांचा आहे. एवढ्या पैशांचे संचालकांनी काय केले, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या तीनही माजी संचालकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांची झडती सुरू केल्यामुळे त्यातून काय बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कटारिया मर्चंट्सचे कर्ज फेडले

कटारियाची 3 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. नगर अर्बन बँकेच्या एका कर्जदाराच्या खात्यातून कटारियाच्या खात्यावर तब्बल 30 लाख रुपये वर्ग करण्यात आले. कटारियाने ही रक्कम मर्चंट बँकेच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे मर्चंटस बँकेकडून कशासाठी कर्ज घेतले होते, तसेच त्या कर्जदाराने स्वतःच्या खात्यातून कटारियाला पैसे का दिले, याची चौकशी पोलिस करत आहेत. याशिवाय कर्ज वितरणात संचालक मंडळाने कर्जतारण मालमत्तेचे बनावट व वाढीव मूल्यांकन अहवाल घेतले आणि त्याआधारे कमाल मर्यादेत कर्ज वितरण केले. तसेच कर्ज मंजूर करताना त्याच्या बदल्यात रोख रकमा स्वीकारल्या, असा पोलिसांना संशय आहे.

बहुतांश कर्ज वितरण झाल्यानंतर त्यातून 72 कोटी 75 लाख 22 हजार 558 रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले. त्यामुळे हे पैसे संबंधित कर्जदारांनी स्वखुशीने दिले की परस्पर त्यांच्या खात्यातून वळते करून घेतले गेले, हे तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, थकीत कर्जदारांचे एनपीएमध्ये गेलेले कर्ज नियमित करण्यासाठी हेड ऑफिस इंटर ब्रँच ट्रँझॅक्शन (एचआयओबीटी) अंतर्गत 10 कोटी 86 लाख 74 हजार 900 रुपये कर्जदारांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ही मदत कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली व त्यापोटी संबंधित कर्जदारांकडून काय मोबदला घेण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R...

Nagar Urban cooperative bank
Loksabha Election : निवडणुकीच्या मैदानात प्रथमच झुंजणार दोन माजी IPS अधिकारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com