Nashik Politics : नागपूर, अमरावतीनंतर काँग्रेसचे लक्ष नाशिक 'शिक्षक'वर ; पटोलेंचे गुळवेंना तयारीला लागण्याचे आदेश

Nana Patole News : राज्यातील नागपूर व अमरावती पदवीधर निवडणुकीत बाजी मारल्यानंतर काँग्रेसने आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.
Nana Patole, Adv. Sandeep Gulve News
Nana Patole, Adv. Sandeep Gulve NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील नागपूर व अमरावती पदवीधर निवडणुकीत बाजी मारल्यानंतर काँग्रेसने आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या निवडणुकीत उतरण्याची घोषणा करत मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांना निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गत निवडणुकीत पैठणी वाटपाने गाजलेल्या या मतदारसंघाच्या निवडणुकीत आता आमदार किशोर दराडे विरुध्द ॲड. संदीप गुळवे अशी रंगतदार लढाई होऊ शकते.

जून २०१८ मध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या 'गिफ्ट' वाटपाची राज्यभर चर्चा झाली. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमदार नरेंद्र दराडे यांनी बाजी मारल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत त्यांचे बंधू किशोर दराडेही विधिमंडळात आले होते. त्यामुळे या विषयाची राज्यात जोरदार चर्चा झाली होती.

Nana Patole, Adv. Sandeep Gulve News
PCMC News : पिंपरी महापालिका आयुक्तांची मोठी घोषणा ; दिवाळीसाठी 40 हजार ते अडीच लाखांपर्यंत बोनस मिळणार

शिक्षक मतदारसंघाची मुदत जून २०२४ मध्ये संपुष्टात येत असल्याने आता मतदार नोंदणी सुरू झाली आहे. त्यातच काँग्रेसने (Congress) ॲड. संदीप गुळवे यांची समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असून त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशच प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी दिले आहेत.

कोण आहेत ॲड. संदीप गुळवे ?

काँग्रेसचे एकनिष्ठ नेते स्व. गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव असलेले ॲड. संदीप गुळवे यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांच्या मातोश्री या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष होत्या. स्व. गुळवे यांनी काँग्रेसच्या संकटकाळात नाशिक लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवली. त्यांच्या पश्चात ॲड. गुळवे हे त्यांचा वारसा चालवत आहेत.

त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक म्हणून बिनविरोध पोहोचले. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत. तसेच लोकनेते गोपाळरावजी गुळवे ही स्वत:ची शिक्षण संस्थादेखील ते चालवतात.

Edited by : Amol Jaybhaye

Nana Patole, Adv. Sandeep Gulve News
Shrigonda Politics : श्रीगोंदेकरांसाठी मोठी बातमी ; आता 22 नगरसेवकांच्या हाती कारभार !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com