Nana Patole Criticized Chandrakant Patil : ...म्हणून चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीचे प्रकार घडतात; नाना पटोलेंनी डिवचले

Congress- BJP Politics : चंद्रकांत पाटील यांच्यावर गेल्या काही महिन्यांत अनेकदा शाईफेकीचे प्रकार घडले आहेत
Congress- BJP Politics :
Congress- BJP Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : 'बेरोजगार तरुणांची थट्टा उडविण्यासारख्या वक्तव्यामुळेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शाईफेकीसारखे प्रकार घडतात,' अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

नाना पटोले आज (ता. २८ ) जळगाव जिल्हा दोऱ्यावर आहेत. सकाळीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आंदोलनाला भेट दिली. या वेळी पत्रकारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात बेरोजगारी कुठे आहे, आमच्या संस्थेत शिपाई पदासाठी माणूस मिळत नाही, असे वक्तव्य केल्याचा प्रश्न विचारला.

Congress- BJP Politics :
MP Assembly Election: निवडणूक लढवण्यासाठी उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा; पण काँग्रेसने उमेदवारी नाकारली...

यावर उत्तर देताना, नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता रोज रोजगार मिळाला आहे. त्यामुळे त्यांना आता जनतेशी काही देणे-घेणे नाही, बेरोजगार तरुणांची थट्टा करणारे असे वक्तव्य ते करीत असल्यामुळे असे शाईफेकीसारखे प्रकार त्यांच्यासोबत घडतात. अशा प्रकरणावर आपल्याला जास्त काही बोलायाचे नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाने आता तरुणांच्या जखमेवर मीठ चोळने बंद करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या भाजप संबंधांबाबत विचारले असता, ' मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात कोण गेले, त्याला कोणी विरोध केला. त्यांचे कुणाशी संबंध आहेत, हे सर्व उघड उघड आहे, त्यामुळे आता किती खोटे बोलाल दानवे साहेब, असा पलटवारही पटोलेंनी केला. नाना पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने त्यांचे साटेलोटे आहे. भाजपचे आणि सदावर्तेंचे कसे संबंध आहेत. हेही एसटीच्या संपावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. सदावर्ते हा भाजपचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळाच माणून आहे. हे सर्वांना कळले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Congress- BJP Politics :
Sanjay Raut News : PM मोदींचं शरद पवारांवरील वक्तव्य म्हणजे विकृती; संजय राऊतांची बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com