K. C. Padavi Vs Vijayakumar Gavit: आजी-माजी आदिवासी विकास मंत्री व्यासपीठावरच भिडले; नेमकं काय झालं?

Nandurbar District Planning Committee K. C. Padavi on Vijayakumar Gavit: ऐरवी शांत राहणारे हे दोन्ही नेते पहिल्यांदाच भिडले. त्यामुळे काहीकाळ उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली.
K. C. Padavi Vs Vijayakumar Gavit
K. C. Padavi Vs Vijayakumar GavitSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar: नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आजी-माजी आदिवासी विकास मंत्र्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. व्यासपीठावर बसलेले हे दोन्ही नेते थेट अरेतुरे अन् हमरीतुमरीच्या भाषेवर आल्याने गोंधळ उडाला. भाजपचे विद्यमान आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित आणि काँग्रेसचे आमदार, माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यात हा वाद झाला.

जिल्हा नियोजन समितीचा आदिवासी उपयोजनेचा निधी जिल्हा परिषद मार्फत खर्च व्हावा, असे आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढले आहे का? अशी विचारणा आमदार के. सी. पाडवी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्र्यांना केली.यावर उत्तर देतांना मी संबधीत विभागाच मंत्री आहे, असे परिपत्रक काढले असेल तर सभागृहाला दाखवा अथवा खोट बोलू नका, असे डॉ. विजयकुमार गावितांनी सांगितले.

दोघांमध्ये काही काळ चांगलीच हमरीतुमरी झाली. ऐरवी शांत राहणारे हे दोन्ही नेते पहिल्यांदाच भिडले. त्यामुळे काहीकाळ उपस्थितांची चांगलीच धावपळ उडाली. यावर पालकमंत्री अनिल पाटील यांनी मध्यस्थी करुन दोन्ही नेत्यांना शांत केले.

K. C. Padavi Vs Vijayakumar Gavit
Vidarbha Politics: विदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कॉन्फिडन्स वाढला; 'या' विधानसभांवर ठोकला दावा

विजयकुमार गावितांची मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याने त्यांनी असे केल्याचा संशय आल्यानचे आमदार के.सी. पाडवींनी याबाबत विचारणा केली. त्यातच के. सी पाडवी यांचा मुलगा गोवाल पाडवी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत डॉ. विजयकुमार गावितांची कन्या हिना गावित यांचा पराभव केला आहे. त्यामुळे त्याच्या जखमेवर मीठ चोळले गेल्यानेच त्यांनी असे रुद्ररुप धारण केल्याचे आमदार के.सी पाडवी म्हणाले.

खोटे बोलून लोकांची दिशाभुल करण्याचा कार्यक्रमच काँग्रेसने सुरु केला असून मी सहअध्यक्ष असल्याने आणि सोबतच माझ्या विभागाशी निगडीत झालेला आरोप असल्याने मी त्यावर उत्तर देणे माझे काम असल्याचे डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com