Nandurbar Politics: इच्छुकांना नवे बळ, नंदुरबारमध्ये तीन पालिकांमध्ये ओबीसी, धडगाव नगराध्यक्षपद खुला प्रवर्गांसाठी आरक्षित

Nandurbar municipal election 2025 Mayor Reservation: नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगरपालिकांसाठी (नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा) नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
Nandurbar municipal election 2025 Mayor Reservation
Nandurbar municipal election 2025 Mayor ReservationSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

नंदुरबार : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये महिलांसाठी कोणतेही आरक्षण जाहीर झालेले नाही, ज्यामुळे पुरुष इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणामुळे इच्छुकांच्या आशांना नवे बळ मिळाले असून, जिल्ह्यात लवकरच राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील चार पैकी तीन नगरपालिकासाठी ओबीसी आरक्षण तर धडगाव नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून असलेले राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा या जिल्ह्यातील चार पालिका आहेत. यापैकी नंदुरबार ही सर्वात मोठी आणि जिल्ह्याच्या मुख्यालयाची नगरपालिका आहे, त्यापाठोपाठ शहादा मोठी पालिका आहे. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या पालिकांवर प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे लोकनियुक्त पदाधिकारी कधी नियुक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राज्य सरकारने आता निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला वेग दिला आहे. अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. मतदार याद्या निश्चित करण्यात आल्या आहेत. आता नगराध्यक्ष पदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. यापाठोपाठ प्रभागनिहाय आरक्षण देखील लवकरच जाहीर होणार आहे.

Nandurbar municipal election 2025 Mayor Reservation
Hatkangale Tahsil: प्रस्थापितांना संधी; महाविकास आघाडीवर उमेदवार शोधण्याची वेळ

पालिका निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्वच इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्यांची धाकधूक वाढली आहे. नुकताच झालेल्या गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला.

अनेक माध्यमांचा उपयोग करून त्यांनी प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न केले.आता केवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतात की पालिका निवडणुका आधी होतात, याकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय नेत्यांचे आणि नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com