Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Nandurbar NCP General Secretary Rao More resigns: राव मोरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे लहान बंधू आहेत या सोबतच ते एक उद्योजक देखील आहेत. त्यांच्या विविध शैक्षणिक संस्था आहेत. राव मोरे हे शहरातील तरुणांचे आवडते नेते आहेत.
ajit pawar, Rao More
ajit pawar, Rao MoreSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar News: विधानसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तसे पदाधिकारी आणि नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून अनेक नेते पक्षांतर करीत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातही त्याची सुरुवात झाली आहे. नंदुरबारमधील एका मोठ्या नेत्यांसह 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला असल्याचे मानले जाते.

नंदुरबार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी आपल्या पदाच्या राजीनामा दिला आहे. आपला वैयक्तिक कारणामुळे हा राजीनामा दिला असल्याचं राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

पक्षात होत असलेली मनमानीमुळे राव मोरे यांनी हा राजीनामा दिला असल्याचा बोललं जात आहे. राव मोरे हे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे बंधू आहेत. त्यामुळे यांनी दिलेल्या राजीनामामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ajit pawar, Rao More
Pooja Khedkar: पूजा खेडकर यांचे परदेशात पलायन? दिल्ली पोलिसांचे पथक रवाना...

राव मोरे यांच्या नंदुरबार शहरात चांगलं वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. मोरे यांनी राजीनामा दिल्याने शहरातील 40 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. राव मोरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे लहान बंधू आहेत या सोबतच ते एक उद्योजक देखील आहेत. त्यांच्या विविध शैक्षणिक संस्था आहेत. राव मोरे यांच्या नंदुरबार शहरासह परिसरामध्ये तरुणांचे आवडते नेते आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com