Vijaykumar Gavit: भाजपच्या माजी मंत्र्यांची शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांवर आगपाखड; कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना दिली नाही....

MLA Vijaykumar Gavit Attack on Congress & Shiv Sena: येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयकुमार गावित यांनी केलेल्या या आरोपांमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dr Vijaykumar Gavit, Chandrakant Raghuvanshi & K. C. Padvi
Dr Vijaykumar Gavit, Chandrakant Raghuvanshi & K. C. PadviSarkarnama
Published on
Updated on

Summary

  1. नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.

  2. भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांवर जिल्ह्यात एकही योजना न आणल्याचा आरोप केला.

  3. गावित यांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सागर निकवाडे

Nandurbar News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांच्या सभा आणि मेळाव्यांमधून जिल्ह्यातील नेते आता एकमेकांवर आगपाखड करु लागले आहेत. भाजपचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांवर घणाघात केला आहे.

"नंदुरबार जिल्ह्यात आमच्या परिवाराशिवाय कुठल्याही पुढाऱ्याने एकही योजना आणली नाही," असा थेट आरोप भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केला आहे. नागरिकांसाठी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांना विरोधकांनी तक्रारी करून बंद पाडल्याचा आरोप केला. नंदुरबार तालुक्यातील भालेर येथे 'जनतेशी संवाद' कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

माजी आदिवासी विकास मंत्री असलेले डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी नाव न घेता शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला. जिल्ह्यात एकही पुढारी असा दाखवून द्या ज्यांनी लोकहिताच्या योजना स्वतःहून आणल्या आहेत,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. गावित म्हणाले, "आम्ही नागरिकांसाठी नेहमीच लोकहिताच्या योजना आणण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने विरोधकांनी त्यात अडथळे आणले. आमच्या योजनांना तक्रारी करून बंद पाडण्याचे काम त्यांनी केले. मात्र, तरीही आम्ही जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहोत,"

माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गेल्या महिन्यात जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांना चोर म्हटले होते. त्यावेळी डॉ.विजयकुमार गावित यांना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. डॉ. विजयकुमार गावित हे देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व्यक्ती असल्याची टीका काँग्रेसचे माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी केली होती. यापूर्वी विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नेत्यांना चोर म्हणून संबोधल्यावर काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले आहेत.

Dr Vijaykumar Gavit, Chandrakant Raghuvanshi & K. C. Padvi
Rohit Pawar: आव्हान स्वीकारत रोहित पवारांनी दिला बावनकुळेंना थेट पुरावाच!

येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयकुमार गावित यांनी केलेल्या या आरोपांमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

FAQ

Q1. डॉ. विजयकुमार गावित यांनी कोणत्या पक्षांवर टीका केली?
A1. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांवर टीका केली.

Q2. गावित यांनी काय आरोप केला?
A2. त्यांनी सांगितले की त्यांच्या परिवाराशिवाय इतर कोणत्याही नेत्याने जिल्ह्यात योजना आणली नाही.

Q3. हे वक्तव्य कोणत्या कार्यक्रमात करण्यात आले?
A3. 'जनतेशी संवाद' कार्यक्रमात भालेर येथे हे वक्तव्य करण्यात आले.

Q4. यामुळे जिल्ह्यात काय होऊ शकते?
A4. या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com