Narhari Zirwal Politics: महायुतीचा पाय खोलात, आदिवासी आमदारांनी दिला राजीनाम्याचा इशारा!

Narhari Zirwal politics; Mahayuti's foot deep, tribal MLAs given warning on Reservation issue-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर केलेल्या घोषणेने आदिवासी आमदार नाराज
Narhari Zirwal, Eknath Shinde & Devendra Fadanvis
Narhari Zirwal, Eknath Shinde & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Politics News: धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरील आंदोलन राज्य सरकारची अडचण ठरू लागले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली होती. त्यातील निर्णयाने नवी समस्या उद्भवली आहे.

भारतीय जनता पक्षाने उत्साहाच्या भरात केलेल्या काही घोषणा आता अडचणीच्या ठरू लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी धनगर समाजाच्या शिष्ट मंडळाशी चर्चा केली. त्यात त्यांना आदिवासी घटकांतील आरक्षण देण्याचे आश्वासन दिले.

हे आश्वासन महायुती सरकारची चांगलीच अडचण ठरण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात भाजपचा पाया आणखी खोलात गेल्यासारखी स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणा आणि बैठकीवर महायुतीच्या आदिवासी आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

धनगर समाजाला देण्यात येणारे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत आदिवासी घटकातून दिले जाणार नाही. त्याला सर्वोच्च न्यायालयाने देखील दुजोरा दिलेला आहे. आदिवासी घटकांमध्ये सध्या 45 घटक आहेत त्यात धनगर हा 46 वा घटक येऊ शकणार नाही.

Narhari Zirwal, Eknath Shinde & Devendra Fadanvis
Sharad Pawar Politics: भुजबळ विरोधात कोण वाजवणार तुतारी? शरद पवारांकडे दोन तास चाचपणी!

भाजपने याबाबत स्पष्ट खुलासा करावा अन्यथा त्याविरुद्ध आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराच या महायुतीच्या आमदारांनी दिला आहे. यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी थेट इशारा दिला आहे. राज्यातील आदीवासी आमदारांनी आपल्याशी संपर्क केल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष एन. डी. गावित यांनीच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. या संदर्भात लवकरच सर्व आदिवासी लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल.

याबाबत भाजपच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या अध्यक्षांना देखील कळविण्यात आल्याचे गावित म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी धनगर यांना आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला त्याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यातील सर्व आदिवासी आमदार आणि खासदार एकत्र येऊन सरकार विरोधात भूमिका घेतील, असा इशारा देण्यात आले.

Narhari Zirwal, Eknath Shinde & Devendra Fadanvis
Laxman Hake : ''स्थानिक स्वराज्य'च्या निवडणुका नाहीत, कारण ओबीसी आरक्षण संपवलंय'; लक्ष्मण हाकेंचा घणाघात

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातत्याने विविध भूमिका घेणाऱ्या भाजपची चांगलेच कोंडी होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच एकीकडे धनगर समाजाचे आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे आदिवासी लोकप्रतिनिधी सावध झाले आहेत.

महायुतीच्या आदिवासी आमदारांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाचा शिष्टमंडळाला दिलेला आश्वासनाने वादाची ठिणगी पडली आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com