Suhas Kande: महायुतीत वाद पेटला; आमदार कांदेंचा भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले,'मला पैशाच्या ऑफर, धमक्या...

Suhas Kande Vs Chhagan Bhujbal : माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता. त्यानंतर विद्यमान आमदार कांदे आणि भुजबळ यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Suhas Kande, Chhagan Bhujbal
Suhas Kande, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nandgaon Political News : नांदगाव विधानसभा मतदारसंघात माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. उमेदवारी दाखल करताना भयमुक्त नांदगाव मतदारसंघ अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे ही निवडणूक गाजणार हे स्पष्ट झाले आहे.

माजी खासदार समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई शहर अध्यक्ष होते. आपल्या या पदाचा माजी खासदार भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना पाठविले आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांनी कार्यकर्ते आणि समर्थक यांच्या आग्रहातून नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केल्याचा दावा केला होता. त्यानंतर विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande) आणि भुजबळ यांच्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर सायंकाळी आमदार कांदे यांनी भुजबळ यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

Suhas Kande, Chhagan Bhujbal
Pandharpur Politics : अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी परिचारकांवर समर्थकांचा दबाव; माजी आमदार कोणती भूमिका घेणार?

आमदार सुहास कांदे म्हणाले, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी अद्यापही सुरू आहे. ही याचिका भुजबळ यांच्यासाठी अडचणीचे आहे. त्यामुळे ती याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती.

आमदार कांदे यांनी आपल्या शैलीनुसार गंभीर आरोप केले. त्यांनी भुजबळ यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ते म्हणाले, मला पैशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या, धमक्याही देण्यात आल्या.

मात्र, मी त्याला बदलणार नाही. या धमक्यांनंतरही मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही,भविष्यातही घेणार नाही. त्यामुळेच भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत, हा राग काढण्यासाठीच त्यांनी माझ्यावर विविध आरोप केले.

Suhas Kande, Chhagan Bhujbal
Sameer Bhujbal : समीर भुजबळ यांचे बंड; सुहास कांदे यांची निवडणूक झाली अवघड?

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी शिक्षा म्हणून मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचेच हा माझा संकल्प आहे. त्यापासून मला कोणीही विचलित करू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी आमदार कांदे यांनी माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना चिमटा काढला. भयमुक्त नांदगाव करण्याची भाषा करणे म्हणजे राक्षसानेच सत्यनारायणाची पूजा करणे असे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिल्यास मी येवल्यातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनर्रचार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com