Nashik Crime: धक्कादायक; ४०० कोटींचा काळा खेळ! दोन हजारांच्या नोटांचा कंटेनर सापडताच ‘कल्याण कनेक्शन’ उघड

Nashik 400 crore robbery: Direct link of Kalyan builder to Nota Kalyan, allegations against police-चारशे कोटींच्या कंटेनरच्या लुटीवर पोलिसांकडूनच पांघरून घालण्याचा आटापिटा? अपहृत तरुणाचा आरोप.
Sandip Patil
Sandip PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik Police News: केंद्र शासनाने नोटबंदी केली. त्यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्या. मात्र या बाद झालेल्या चारशे कोटींच्या नोटांच्या कंटेनर वरून वेगळेच महाभारत सुरू झाले आहे.

गतवर्षी कर्नाटकात चारशे कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा असलेला कंटेनर लुटण्यात आला. याबाबत कर्नाटक पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले असून नाशिक पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

इगतपुरी येथील संदीप पाटील या युवकाचे पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून अपहरण करण्यात आले होते. त्याला बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यातून या प्रकरणाचे धागेदोरे उघडकीस आले आहेत.

Sandip Patil
JP Gavit Politics: राज्य सरकार पुन्हा अडचणीत; पालघरला घेराव असताना आता नाशिकहूनही आदिवासींचा लॉंग मार्च मुंबईकडे!

संदीप पाटील या इगतपुरीच्या तरुणाच्या नावाने कल्याणच्या बांधकाम व्यवसायिकाला व्हाट्सअप वरून खंडणी मागण्यात आली होती. 400 कोटींचा कंटेनर परत देण्यासाठी शंभर कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाने काही गुंडांच्या माध्यमातून व्हाट्सअप नंबर असलेल्या तरुणाचे २२ ऑक्टोबरला अपहरण घडवले होते.

Sandip Patil
Nashik Mayor Politics: महापौरपदाच्या आडून नाशिकमध्ये विधानसभेच्या उमेदवारीची फिल्डिंग पुन्हा एकदा चर्चेत, भाजप आमदार झाल्या सावध!

यामध्ये प्रत्यक्षात संदीप पाटील याचा काहीही संबंध नव्हता. त्याच्या नावाने कंटेनर लुटणाऱ्या नायडू आणि अन्य दोघांनी हे कृत्य केले होते. पुढे ते उघडकीस आले. सावधगिरी म्हणून अपहरण केलेल्या युवकाने सर्व बाबी कथन करीत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर वेगळाच खेळ सुरू झाला.

या संदर्भात संदीप पाटील याने नाशिकच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. तक्रार पोलीस निरीक्षकांकडे सोपविण्यात आली. मात्र या अधिकाऱ्याने प्रकरणाची चौकशी करणे ऐवजी तक्रारदाराला टाळण्याचा प्रयत्न केला. पर्यंत एकदाही तक्रारीबाबत काहीही कारवाई अथवा चौकशी झालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप संदीप पाटील याने केला आहे.

कल्याण येथील बांधकाम व्यावसायिकाचा हा कंटेनर होता. त्यात नोटबंदीमुळे बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या 400 कोटींच्या नोटा होत्या. संबंधित बांधकाम व्यवसायिका ने युवकाला कुठेही तक्रार करू नको. आम्ही पोलिसांपासून न्यायाधीशांपर्यंत सगळ्यांना मॅनेज करू शकतो, असे सांगितल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

अपहरण केलेल्या संदीप पाटील याने याबाबत एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटक पोलीस तपासाला आले असता नाशिकच्या पोलिसांनी त्यांना अजिबात प्रतिसाद दिलेला नाही.

युवकाने केलेल्या तक्रारीवर ही पांघरून घालण्याचा आटापिटा सुरू आहे. त्यामुळे 400 कोटींच्या कंटेनर लूटप्रकरणी कल्याण आणि तेथील बांधकाम व्यवसायिक ही लिंक दडपण्याचा प्रयत्न तर होत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये नक्की कोणती सूत्रे कार्यरत झाली आहेत, याबाबत वेगळीच चर्चा सुरू आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com