नाशिक : नाशिक ते औरंगाबाद मार्गावर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात (Bus Accident)झाला. अपघातानंतर या बसमध्ये आग लागल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे. असे असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदतही जाहीर केली आहे. मुंबईहून तातडीने नाशिककडे रवाना झाले. नुकतीच त्यांनी घटनास्थळाला भेट देत घटनेचा आढावा घेतला. १५ ते २० मिनीट त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अपघतातील जखमींशी रुग्णालयात जाऊन संवाद साधला. तसेच त्यांना तातडीने उपचार मिळावेत, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पुसदमधील चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस आहे. या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ३८ प्रवासी जखमी झाले. (Ten travelers death in bus burn after accident in Nashik) मृतांमध्ये बसचा चालक आणि काही मुलांचाही समावेश आहे.
ही बस स्लीपर कोच होती. पहाटे अपघात झाला तेव्हा अनेक प्रवासी झोपेत होते. त्यांना त्यातून बाहेर पडणे देखील शक्य झाले नाही. पहाटेचे 5:15 वाजले असल्याने बहुतांश प्रवासी साखर झोपेत होते, त्यांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.