नाशिकची विमानसेवा बंद होऊ देणार नाही!

मंत्री डॅा भारती पवार यांचा आरोप, प्रवासी मिळूनही तोट्याचे कारण देत विमानसेवा बंद
Dr. Bharti Pawar
Dr. Bharti PawarSarkarnama

नाशिक : नाशिकच्या (Nashik) विमानसेवेबाबत (Air Traffic) लोकप्रतिनिधी काहीच प्रयत्न करीत नाहीत, असे चित्र विरोधकांकडून रंगवले जात आहे. प्रत्यक्षात आमचा पाठपुरावा सुरु आहे. मंत्रालयाकडून (Aviation ministry) त्याला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकची विमानसेवा (Air service) बंद होऊ देणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी सांगितले. (Centre minister of state Dr. Bharti Pawar said i have taken followup)

Dr. Bharti Pawar
अंधेरी रातोमे एक मसीहा निकलता है...वाळू माफीया धास्तावले!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी बंद झालेल्या विमानसेवेबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माहिती दिली.

Dr. Bharti Pawar
सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे का केले नाही!

ओझर विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीमार्फत उडान योजनेंतर्गत सुरू असलेली विमानसेवा १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली. विमानसेवेवरून नाशिकचे दिल्लीत प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी अडचणीत आल्यानंतर आता विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. परंतु, ज्या कंपनीने विमानसेवा बंद केली त्या अलायन्स कंपनीने कमर्शिअल रेटनुसार प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत सेवा बंद केल्याचे पत्र दिले. मात्र जवळपास ८० टक्के प्रवासी मिळत असताना सेवा बंद केल्याने नागरिकांत नाराजी आहे. यामागे राजकारण तर सुरु नाही ना, असे बोलले जाते.

यासंदर्भात डॉ. भारती पवार म्हणाल्या, नाशिकमधून इंडिगोची सेवा सुरू करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली. केंद्र सरकारने उडेगा आम आदमी अर्थात उडान योजनेंतर्गत गर्दीच्या शहरातून मोठ्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. योजनेंतर्गत प्रवाशांमागे पन्नास टक्के भाडे केंद्र सरकार अदा करते. नाशिकच्या ओझर विमानतळावरून सुरवातीला इंडिगो, एअर अलायन्स, ट्रू- जेट, स्पाइस जेट व स्टार कंपन्यांनी विमानसेवा सुरू केली. इंडिगो, ट्रू जेट तसेच स्टार कंपनीने कालांतराने सेवा बंद केली.

सध्या अलायन्स एअर कंपनीमार्फत नाशिक- पुणे, नाशिक-अहमदाबाद- दिल्ली, तर स्पाइस जेट कंपनीकडून नाशिक- हैदराबाद, नाशिक- दिल्ली तसेच नाशिक- पुद्दुचेरी व नाशिक- तिरुपती कनेक्टिंग सेवा सुरू केली होती. अलायन्स एअर कंपनीने उडान योजनेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने १ नोव्हेंबरपासून सेवा बंद केली. तर, ओझर विमानतळाचा रन- वे मेन्टेनन्ससाठी तेरा दिवसांसाठी बंद करण्यात आल्याने १ डिसेंबरपासून स्पाइस जेटची सेवा पुर्ववत केली जाणार आहे. परंतु नाशिकमधून विमानसेवा बंद झाल्याचे वातावरण तयार होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. पवार यांनी वस्तुस्थिती मांडली. त्या म्हणाल्या, विमानसेवेला प्रोत्साहन मिळावे म्हणून उडान योजना सुरू करण्यात आली होती. परंतु, जानेवारीत करार संपुष्टात आला तरीही अलायन्स कंपनीने ऑक्टोबरअखेर सेवा सुरू ठेवली.

उडान योजनेचा कालावधी संपुष्टात आल्याने कमर्शिअल रेट प्रवाशांना लागू करण्यात आला. परंतु, त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने सेवा बंद करण्यात आल्याचे कंपनीकडून पत्र देण्यात आले. उडान योजनेचा कालावधी वाढविण्याबरोबरच नाशिकमधून इंडिगोची गोवा सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

प्रवाशांचा प्रतिसाद तरीही सेवा बंद

या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात १०३ फ्लाइट ओझर विमानतळावर आल्या. त्यात सहा हजार २३८ प्रवासी नाशिकला आले व नाशिकहून सहा हजार ७३२ प्रवासी गेले. ऑक्टोंबर महिन्यात ७६६२ प्रवासी विमानाने आले व आठ हजार ४४५ प्रवासी विमानाने अन्य शहरात गेले. ७२ सीटरच्या विमानाचा विचार करता जवळपास ऐंशी टक्के प्रतिसाद मिळाला. उडान योजनेंतर्गत प्रतिप्रवासी पन्नास टक्के अनुदान होते. विमान कंपन्यांचे वाढीव दर व प्रवाशांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता कमर्शिअल रेट परवडत नसल्याचे कंपन्यांनी दिलेले कारण असमाधानकारक असल्याचे बोलले जात आहे.

मेन्टेनन्ससाठी तेरा दिवस रन-वे बंद ठेवण्यात आला आहे. त्यानंतर स्पाइस जेट कंपनीची सेवा सुरू राहील. अलायन्स एअर कंपनीने कमर्शिअल रेटने प्रतिसाद मिळाल्याचे कारण देत सेवा बंद केली आहे. त्यामुळे उडान योजनेचा कालावधी वाढविण्यासाठी अन्य शहरांमध्ये सेवा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

- डॉ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com