Chhagan Bhujbal News : धमकीनंतर वाढदिवशीच छगन भुजबळांच्या बॅनरला काळे फासले...

Nashik Politics : छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता.
Chhagan Bhujbal News
Chhagan Bhujbal News Sarkarnama
Published on
Updated on

Nashik : अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना जिवे मारण्याच्या धमकीचे फोन येत असतानाच आता त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये त्यांच्या बॅनरवर काळी शाही फेकल्याची घटना घडली आहे. भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज (रविवारी) येवला-नाशिक राज्य महामार्गावर अंगणगावाजवळ लावण्यात आलेला शुभेच्छा बॅनर हा अज्ञात व्यक्तीने फाडला. त्यावर काळी शाहीदेखील फेकल्याचे दिसते. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त हा शुभेच्छा बॅनर लावण्यात आला होता.

Chhagan Bhujbal News
Manoj Jarange News : जरांगे-भुजबळांमध्ये वात पेटली; "शिंदे-फडणवीसांनी भुजबळांना समज द्यावी." : जरांगे आक्रमक

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील दौरा करीत आहेत. त्यांच्या उपोषणानंतर सरकारने मराठा-ओबीसी दस्तावेज शोधण्यासाठी न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केलेली आहे. मात्र, मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्र मागणीमुळे ओबीसी समाजात अस्वस्थता आहे. भुजबळांनी जरांगेंच्या मागणीला विरोध केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

या मुद्द्यांवरून जरांगे-भुजबळ असा वाद रंगला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना फोन वरून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटलांनीही अनेक वेळा भुजबळांवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना फोन वरून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

भुजबळ म्हणाले होते की, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही. मात्र, मराठा समाजाचे नेते मलाच लक्ष्य करतात. त्यावर जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज द्यावी."

Chhagan Bhujbal News
Harshvardhan Jadhav News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव दुसऱ्यांदा बोहल्यावर; कोण आहेत ईशा झा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com