IAS Jalaj Sharma: जिल्हाधिकारी शर्मा यांनी असे काय केले की, पंतप्रधान कार्यालयानेही केले कौतुक!

Nashik collector; IAS jalaj Sharma will felicitate with PM award for Nashik- पंतप्रधान कार्यालयाच्या योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या कल्पकतेला मिळाली दाद
IAS Jalaj Sharma
IAS Jalaj SharmaSarkarnama
Published on
Updated on

IAS Sharma News: नाशिक जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या योजना कल्पकतेने राबविल्याने त्याची दखल घेण्यात आली आहे. त्याला निमित्त ठरले जिल्हाधिकारी जलज शर्मा.

पंतप्रधान कार्यालयाकडून सामान्य नागरिक यांच्या व्यक्तिगत तसेच सार्वजनिक विकासाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी किती प्रमाणात झाली आणि कशाप्रकारे झाली. यावर सामाजिक स्तर उंचावतो. या अनुषंगाने नुकतीच एक पाहणी करण्यात आली.https://sarkarnama.esakal.com/maharashtra/uttar-maharashtra/chhagan-bhujbal-ncp-dy-cm-ajit-pawar-in-political-trouble-sd67

IAS Jalaj Sharma
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ यांनी वाढवल्या अजित पवारांच्या अडचणी...

केंद्र शासनाच्या पंतप्रधान कार्यालयाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात नाशिकला अग्रस्थान मिळाले आहे. त्याचे श्रेय कल्पक अंमलबजावणी आणि पुढाकार घेणाऱ्या जिल्हाधिकारी शर्मा यांना जाते. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे.

IAS Jalaj Sharma
Manikrao Kokate Politics: कृषिमंत्र्यांना उपरती, म्हणाले, `कामासाठी मी दिवस की रात्र हे देखील पहात नाही`

त्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा यांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नाशिक या योजना राबविण्यात आघाडीवर राहिल्याने त्याचे सगळीकडेच कौतुक होत आहे. नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण केले जाईल. केंद्र शासनातर्फे दरवर्षी २१ एप्रिल या दिवशी नागरी सेवा दिन पाळला जातो. त्या औचित त्याने देशभरात चांगले काम करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने २०२३ मध्ये झालेल्या पंतप्रधान कार्यालयाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी शर्मा यांची निवड केली आहे.

जिल्हाधिकारी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या पंतप्रधान घरकुल, पीएम विश्वकर्मा, हर घर जल, उज्वला योजना, मुद्रा योजना, पोषण आहार योजना, यांसारख्या बारा योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली.

त्याला चांगले यश मिळाले. त्यामुळे जिल्हास्तरावरील या कामाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या पडताळणी नंतर दिलेल्या अहवालाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

देशभरातील सनदी अधिकाऱ्यांना मुलाखतीसाठी दिल्ली येथे पाचारण करण्यात येत असते. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता कशाप्रकारे पुढाकार घेतला. कोणते वेगळे प्रयत्न केले. प्रशासनाला गती देण्यासाठी काय प्रयोग केले याची नोंद या मुलाखती द्वारे घेतली जाते.

केंद्र शासनाच्या मुख्य सचिवांकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या मुलाखती गतवर्षी पार पडल्या होत्या. त्या मुलाखतींमधून जिल्हाधिकारी शर्मा यांची निवड पंतप्रधान कार्यालयातून करण्यात आली. पंतप्रधानांचे मुख्य सचिव सचिव व्ही. श्रीनिवास यांनी पत्राद्वारे जलज शर्मा यांना याबाबत कळविले आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन देखील करण्यात आले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com