Congress News: वोट चोरी हा मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उचलून धरला आहे. निवडणूक आयोग मात्र त्याला प्रतिसाद देत नसल्याने संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असाच एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार नाशिक महापालिकेच्या मतदार यादीत उघड झाला आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीची मतदार यादी वादात सापडली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने याबाबत आक्षेप नोंदवला. त्याचे गांभीर्य लक्षात आल्यावर आता सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे पक्षानेही आक्रमक भूमिका घेतली.
यासंदर्भात काँग्रेसचे माजी नगरसेवक राहुल दिवे आणि आशा तडवी यांच्या प्रभागात धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बागलाण, सिन्नर आणि ग्रामीण भागातील नऊ हजार मतदार समाविष्ट केले आहेत. या मतदारांमुळे चक्क निकालच बदलू शकतो.
महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही माहिती मिळताच यादीत शेकडो त्रुटी आढळले आहेत. या त्रुटी की जाणीवपूर्वक केलेला गोंधळ अशी शंका यावी अशी स्थिती आहे.
महापालिका प्रभाग क्रमांक १६ मध्ये ३८ बूथ आहेत. प्रभागाच्या यादीत ९६१ मतदार दुबार आहेत. या प्रभागातील दोन हजार सहाशे मतदार अन्य प्रभागांमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. हे कोणी आणि का केले? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदार यादीची तपासणी केली. त्यात चक्क नऊ हजार मतदार बागलाण आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आढळले. बागलाण आणि सिन्नर यांचा शहराशी काहीही संबंध नसताना हे मतदार आले कसे? आणि कुठून? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या मतदारांमुळे प्रभागाचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे हे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
यासंदर्भात मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अन्य नेत्यांनी महापालिका आयुक्तांना धारेवर धरले होते. सुमारे पावणे चार लाख मतदार शहरी भागात सदोष आढळले आहेत. त्याची दुरुस्ती होणार तरी केव्हा? असा प्रश्न पडतो.
माजी नगरसेवक दिवे यांसह, आशा तडवी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सूर्यवंशी, अनिल गांगुर्डे, जी नगरसेवक विजय ओहोळ, सुमन ओहोळ, दिलीप प्रधान, आदिवासी बचाव समितीचे मुन्ना तडवी, प्रवीण नवले आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला निवेदन देत इशारा दिला आहे. उपयुक्त अशोक साताळकर यांना या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.