Nashik Constituency 2024 : नाशिकमध्ये छगन भुजबळ की हेमंत गोडसे? हा पेच कायम

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ आपला दावा सोडण्यास तयार नसल्याने गोडसे यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता. नाशिक मतदारसंघबाबत होणारी पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली, त्यामुळे मतदारसंघाचा वाद अधिक चिघळणार असे संकेत मिळत आहेत.
Nashik Constituency 2024 : नाशिकमध्ये छगन भुजबळ की हेमंत गोडसे? हा पेच कायम

Hemant Godse News : नाशिक मतदारसंघ कोणाचा यावरून महायुतीमध्ये वाद आहे. हा वाद सातत्याने वाढत चालला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट Shivsena आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार NCP गटात मोठी स्पर्धा आहे. या वादात कोणाची सरशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिक मतदारसंघ Nashik Constituency शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आल्याच्या बातम्या त्या पक्षाच्या नेत्यांकडूनच दिल्या जात आहेत. प्रत्यक्षात मात्र यावर गेल्या दोन आठवड्यांत निर्णय होऊ शकले नाही. नाशिक मतदारसंघाचा निर्णय सिंधुदुर्ग आणि सातारा या मतदारसंघांसोबतच होईल, अशी अपेक्षा होती. काल याबाबत सिंधुदुर्ग मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे Narayan Rane यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, नाशिक मतदारसंघाबाबत होणारी पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली, त्यामुळे मतदारसंघाचा वाद अधिक चिघळणार असे संकेत मिळत आहेत.

महायुतीच्या MVA नेत्यांमध्ये राज्यातील चार मतदारसंघांचा प्रश्न अनिर्णीत आहे. निवडणुकीची प्रक्रिया बरीच पुढे सरकली आहे. मात्र, हा निर्णय होत नसल्याने इच्छुक उमेदवार तसेच महायुतीचे नेतेदेखील नाराज आहेत. नाशिक मतदारसंघ शिवसेनेचे एकनाथ शिंदे Eknath Shinde गटाला हवा आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे Hemant Godase यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारीदेखील केली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक उमेदवारीची घोषणा केव्हा होते, या प्रतीक्षेत आहेत.

Nashik Constituency 2024 : नाशिकमध्ये छगन भुजबळ की हेमंत गोडसे? हा पेच कायम
Dindori Constituency 2024: शरद पवारांना धक्का, जे. पी. गावित बिघडवणार 'दिंडोरी'चे गणित

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हा ओबीसी चेहरा म्हणून भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत उतरवायचा आहे. मंत्री भुजबळ Chhagan Bhujbal यांना उमेदवारी देण्याबाबत थेट दिल्लीतूनच घेण्यात आला आहे. मात्र याबाबत शिंदे गट तडजोड करण्यास तयार नाही. शिंदे गटाच्या चार जागा यापूर्वीच कमी झाल्या आहेत. दोन विद्यमान खासदार उमेदवारी नसल्याने निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर आहेत. त्यामुळे शिंदे गटाने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. त्याला भुजबळ यांनीदेखील तेवढ्याच क्षमतेने आव्हान दिले आहे. या वादात भुजबळ यांच्या उमेदवारीच्या आग्रहामुळे गोडसे यांच्या उमेदवारीचा पेच वाढत चालला आहे.

गोडसे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने प्रचार सुरू केला आहे. आज सिन्नर तसेच त्र्यंबकेश्वर सह काही आदिवासी भागात महिलांनी गोडसे यांची पत्रके वाटली. स्वतः गोडसे यांना मात्र पक्षाकडून स्पष्ट संकेत नाहीत. नाशिक मतदारसंघ शिंदे गटाला मिळाल्यास गोडसे यांच्यासह माजी उपमहापौर अजय बोरस्ते हेदेखील इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यामुळे गोडसे यांच्या उमेदवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बोरस्ते यांचाही अडथळा आहे. हा अडथळा दूर करण्यात गोडसे यशस्वी होतील का? यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये संमिश्र भावना आहे. या सर्व राजकीय घडामोडी शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मात्र प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.

R

Nashik Constituency 2024 : नाशिकमध्ये छगन भुजबळ की हेमंत गोडसे? हा पेच कायम
Solapur Lok Sabha 2024 : ‘एमआयएम’ची सोलापुरातील माघार कुणाच्या फायद्याची?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com