NCP Ajit Pawar Politics News : नाशिक मतदारसंघ महायुतीच्या कोणत्या पक्षाला सोडण्यात येईल? उमेदवार कोण असेल? जागावाटपाचा निर्णय केव्हा होईल? अशा अनेक अनिश्चितता महायुतीमध्ये अद्यापही कायम आहेत. यावरून आता एक नवीन ट्विस्ट आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाशिक मतदारसंघाबाबत विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे बैठक झाली. या बैठकीत नाशिकच्या विविध नेत्यांनी आगामी निवडणूक हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसलाच (NCP) मिळावा, असा आग्रह धरला. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांची नावेदेखील सुचविली. मात्र, ही सर्व चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्यांने केलेल्या सूचनेने उपस्थित नेत्यांनाही अचंबित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादीच्या विविध कार्यकर्त्यांनी अनेक सूचना केल्या ते बहुतांश स्वरूप राजकीय होते. मात्र, सिन्नर येथील योगेश घोटेकर यांनी नाशिक मतदारसंघाचा (Nashik Constituency) राजकीय भौगोलिक आणि सामाजिक पोत काय आहे हे सविस्तर मांडले. नाशिक मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सिन्नर, इगतपुरी आणि देवळाली या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला 75,000 मतांचे मताधिक्य आहे.
त्या तुलनेत शहरी भाग असलेल्या नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये अतिशय निसटते मताधिक्य आहे. या तीन मतदारसंघांमध्ये 47 हजार मताधिक्य आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मतदार प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे. या मतदारांच्या पाठबळावरच पक्ष विजयी होतो. त्यामुळे उमेदवार देताना आणि मतदारसंघाची मागणी करताना या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे.
नाशिक मतदारसंघात आजवर झालेल्या बहुतांशी लोकसभा निवडणुकीत ठराविक समाजाचाच उमेदवार विजयी झाला आहे. समीर भुजबळ (Samir Bhujbal) हे एकमेव अपवाद आहेत. त्यामुळे उमेदवार देताना पक्षाने फ्रेश चेहरा दिला पाहिजे. नवीन उमेदवार दिल्यास त्याच्याविषयी आरोप- प्रत्यारोप किंवा अन्य आक्षेप नसतात.
त्यामुळे पक्षाला या उमेदवाराचा फायदा होतो. घोटेकर यांनी मांडलेल्या या मागणीने उपस्थित सर्वच पदाधिकारी अचंबित झाले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. जागावाटप आणि उमेदवार ठरविण्याचे सर्व अधिकार पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना देण्यात आले.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.