Mahayuti Politics News : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उमेदवारीची चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे प्रमुख दावेदार आहेत. Nashik Mahayuti Candidate Hemant Godase.
नाशिकची विशेष ओळख असलेल्या काळाराम मंदिरात आज श्रीराम नवमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीचे Loksabha Election वातावरण असल्याने इच्छुक उमेदवारांसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या वेळी भुजबळ आणि गोडसे दोघेही समोरासमोर आले. त्यावेळी एक वेगळीच घटना घडली. त्यामुळे कार्यकर्त्यांना चर्चेचा विषय मिळाला. Latest Mahayuti Politics News
नाशिक मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीसाठी परस्परांचे राजकीय स्पर्धक असलेले भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची काळाराम मंदिरात भेट झाली. या वेळी खासदार गोडसे यांनी मंत्री भुजबळ यांना पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. या वेळी माजी खासदार समीर भुजबळ हेदेखील उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांची देहबोली विचारात घेता उमेदवारीसाठी एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या या नेत्यांनी मनोमन काय विचार केला असावा, याबाबत उत्सुकता वाढली. Nashik latest News Politics
काळाराम मंदिराच्या आवारात आणि श्रीराम नवमीच्या उत्सवाला खासदार गोडसे यांनी मंत्री भुजबळ यांचे आशीर्वाद घेतले, मात्र खरोखर भुजबळ गोडसे यांना उमेदवारीसाठी शुभेच्छा देतील का?. उमेदवारी मिळाल्यास प्रचारात मनापासून सहभागी होतील का? अशी चर्चा आहे. गोडसे यांच्याबाबतदेखील ते भुजबळ यांना उमेदवारी मिळाल्यास मनापासून मदत करतील का? हा महायुतीतील घटक पक्षांतील राजकीय स्पर्धेमुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात Nashik Loksabha Election 2009 मध्ये समीर भुजबळ यांनी मनसेचे उमेदवार हेमंत गोडसे Hemant Godase यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये झालेले निवडणुकीत गोडसे यांनी छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांचा पराभव केला होता. 2919 च्या निवडणुकीत गोडसे यांनी समीर भुजबळ यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. गोडसे आणि भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या तीन निवडणुकांत एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने BJP केलेल्या राजकीय खेळीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट हे भाजपबरोबर येऊन महायुती तयार झाली आहे. आता भुजबळ आणि गोडसे दोघेही एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे त्यांची परस्परांविरोधात निवडणुकीत नव्हे तर उमेदवारीसाठी स्पर्धा होणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत नाशिक मतदारसंघातून खासदार गोडसे की मंत्री भुजबळ याचा निर्णय होणार आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.