Dindori Lok Sabha Constituency : जे.पी. गावित यांनी उमेदवारीसाठी कोणाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे?

NCP-CPM Politics, JP Gavit is contract candidate to divide votes : माकपचे गावित भाजपला मदत व्हावी म्हणून उमेदवारी करीत असल्याचा आरोप...
Jayant Patil - JP Gavit
Jayant Patil - JP GavitSarkarnama

NCP Jayant Patil News : जिथे जिथे भाजपचा पराभव दिसू लागतो, तिथे ते अपक्ष उमेदवार उभे करतात. मत विभागणी होऊन फायदा घेण्यासाठी ते काही उमेदवारांना कॉन्ट्रॅक्ट देतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (नाशिक) आणि भास्कर राव भगरे (दिंडोरी) यांनी सोमवारी रणरणत्या उन्हात प्रचंड शक्तिप्रदर्शन केले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पाटील उपस्थित होते. समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी यांसह इंडिया आघाडीचे अन्य पक्षदेखील सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil - JP Gavit
Sanjay Raut news : "कांदा निर्यात बंदीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक"

महाविकास आघाडीचा भाग असलेल्या जे. पी. गावित यांनी नाशिक (Nashik) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला आहे. त्याचा उल्लेख करून जयंत पाटील यांनी जे.पी. गावित यांची चांगलीच खरडपट्टी काढली. माकप हा इंडिया आघाडीचा घटक आहे. राज्यात तो आमच्या बरोबर आहे. या संदर्भात नाशिकमधून उमेदवारी करू नये, म्हणून गावित यांच्याशी चर्चा केली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार माकपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलले होते. त्यात उमेदवारी करू नये असे ठरले होते. तरीही माजी आमदार गावित यांना निवडून येण्याची शक्यता नसतानाही. उमेदवारीचा हट्ट कशासाठी आहे असा प्रश्न त्यांनी केला.

माजी आमदार गावित यांनी दिंडोरी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला मदत होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी महाविकास (Maha Vikas) आघाडीच्या नेत्यांचे फोटो छापून पत्रक तयार केले आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यासाठी त्यांनी कोणाचे तरी कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे, असा गंभीर आरोप पाटील यांनी केला. कार्यकर्त्यांनी माजी आमदार गावित यांच्या उमेदवारांनी गोंधळून जाऊ नये. त्यांचा पुरेपूर बंदोबस्त करण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. त्यांनी छापलेली पत्रके हा शिस्तीचा भंग आहे. त्यांच्या उमेदवारीचे रहस्य काय? हे पुढच्या दौऱ्यात आल्यावर मी सविस्तर सांगेल, असेही पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Jayant Patil - JP Gavit
Modi Solapur Tour : आमच्या पूर्वजांकडून पाप झाले असेल, पण माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ; मोदी असं का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com