BJP Girish Mahajan News: उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव वगळता चारही महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महायुती टाळली. त्यांचे हे डावपेच यशस्वी झाले आहेत.
जळगाव, धुळे आणि नाशिक या तिन्ही महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत येणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सत्तेपासून दूर राहावे लागेल. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तशी खेळी केली.
जळगाव महापालिकेत भाजपने महायुती केली होती. मात्र येथे भाजपचा स्ट्राईक रेट शंभर टक्के राहिला. भाजपचे सर्व ४६ उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधकांना येथे अवघ्या ५ जागा मिळाल्या. मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचा स्वबळावर सत्तेत येण्याचा मार्ग सुकर केला.
नाशिक महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. येथे महायुतीने शंभर प्लस असे टार्गेट जाहीर केले होते. त्यासाठी मंत्री महाजन यांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष पूर्णपणे रिकामा केला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकांचे प्रवेश झाले.
नाशिक महापालिकेत १२२ जागांसाठी भाजपकडे एक हजार ७७ इच्छुक होते. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाशी युती करणे त्यांना परवडणारे नव्हते. जागा वाटपात भाजपच्या जागा कमी झाल्या असत्या. त्याचा अंतिम फटका भाजपला बसला असता.
त्यादृष्टीने मंत्री महाजन यांनी डावपेच आखले. आता त्यांचे डावपेच यशस्वी झाले अशी स्थिती आहे. भाजप स्वबळावर सत्तेत आला. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष सत्तेपासून दूर राहणार आहे. उमेदवारी आणि सत्ता यासाठी शिवसेना शिंदे पक्षात गेलेल्या अन्य पक्षातील नेत्यांचा आता हिरमोड होणार आहे. एक प्रकारे त्यांची कोंडी करण्यात मंत्री महाजन आणि भाजप यशस्वी झाला अशी स्थिती आहे.
धुळे महापालिकेत भाजप सत्तेत होता. येथे अँटी इन्कमबन्सी होती. त्यामुळे सर्व ३१ माजी नगरसेवकांना घरी बसवण्याचा धाडसी निर्णय महाजन यांनी घेतला. असे असतानाही भाजपने आपल्या सर्व ५० जागा कायम ठेवल्या. धुळे येथे ७४ नगरसेवकांच्या या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला आठ, उद्धव ठाकरे यांना पाच, एमआयएम ला दहा तर एक पक्ष नगरसेवक आहे. त्यामुळे भाजपने येथे विजयाचा जल्लोष केला.
जळगाव महापालिका भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची कसोटी असल्याने येथे महायुती झाली. भाजपने येथे सर्वाधिक ४६ उमेदवार दिले होते. हे सर्व विजयी झाले. शिवसेनेला २१ राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे पक्षाला पाच आणि एक अपक्ष असे बलाबल आहे. ७५ सदस्यांच्या जळगाव महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आला आहे.
प्रतिष्ठेच्या बनलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीतही भाजपने मोठा आकडा गाठला. १२२ नगरसेवक असलेल्या या महापालिकेच्या ११८ जागांचे निकाल जाहीर झाले. त्यात भाजपला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे पक्षाला २६ शिवसेना उद्धव ठाकरे १२ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार चार मनसे एक आणि अपक्ष एक असे बलाबल आहे.
नाशिक महापालिका निकाल:
एकूण जागा १२२
निकाल जाहीर ११६
भाजप ७०
शिवसेना शिंदे २६
शिवसेना ठाकरे पक्ष १२
राष्ट्रवादी अजित पवार ४
मनसे १, अपक्ष १
धुळे महापालिका निकाल:
एकूण जागा - ७४
निकाल जाहीर- ७४
भाजप ५०
राष्ट्रवादी अजित पवार ८
शिवसेना ठाकरे पक्ष ५
एम.आय.एम.-१०, अपक्ष- १
जळगाव महापालिका निकाल:
एकूण जागा- ७५
निकाल जाहीर- ७५
भाजप-४६
शिवसेना शिंदे पक्ष-२१
राष्ट्रवादी अजित पवार- १
शिवसेना ठाकरे पक्ष- ५
अपक्ष- २
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.