Shocking; महापालिकेने कोरोनाबळींची आकडेवारी दडवली?

कोरोनाबळींच्या आकडेवारीत नाशिक महापालिकेने दडवादडवी केल्याचे चित्र.
NMC Building
NMC BuildingSarkarnama

नाशिक : कोरोनामुळे (Covid19) मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी महापालिकेकडून (NMC) तब्बल सहा हजार आठशे अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र यातून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून मृतांच्या आकडेवारीच्या दडवादडवीचा संशय येत आहे. यापूर्वी चार हजार ३३ मृत्यूची नोंद जाहीर करण्यात आली होती. असे असताना सहा हजार ८०० अर्ज मंजूर कसे केले, असा सवाल उपस्थित होत आहे.

NMC Building
भाजप नेते दिनकर पाटील यांची संचालकांना सभेतच शिवीगाळ?

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान मदतरूपाने देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार कोरोना मृतांच्या नातेवाइकांनी महापालिकेकडून अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फतदेखील अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यात आठ हजार ७७० रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये महापालिका क्षेत्रात चार हजार ३३, नाशिक ग्रामीण क्षेत्रात चार हजार २५३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ३५८ व जिल्हाबाहेरील १२६ मृतांचा समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये चार हजार ३३ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असताना तेवढ्याच प्रमाणात अर्ज दाखल होणे अपेक्षित होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे आठ हजार अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले. त्यातील चौदाशे अर्ज नामंजूर करण्यात आले.

NMC Building
महाराष्ट्र सीमालढ्यातील आधारस्तंभ हरपला!

कोरोनाच्या रुग्णांची संख्या, उपचार व मृत्यू याबाबत सातत्याने शहरात तक्रारी होत्या. विशेषतः खाजगी वैद्यकीय संस्था व रुग्णालयांनी याबाबत अचुक माहिती व उपचाराचे विवरण सादर करण्यास प्रदिर्घ काळ माहिती सादर केली नव्हती. त्यामुळे संख्येत तफावत असल्याच्या तक्रारी होत्या. आता त्याबाबत सादर झालेली मृत्यूची संख्या विचारात घेता याची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आकडेवारीवरून संशय

महापालिका हद्दीत चार हजार ३३ मृत्यू झालेले असताना महापालिकेकडून सहा हजार ८०० अर्ज मंजूर करण्यात आले. त्यामुळे नेमका यापूर्वी जाहीर करण्यात आलेला आकडा खरा की मृतांचे मंजूर करण्यात आलेले अर्ज खरे, यावरून संभ्रम निर्माण झाला असून, अनुदान मिळविण्यासाठी नातेवाइकांचा खटाटोप तर नाही ना, असाही संशय व्यक्त होत आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com