Nashik Division Teacher Constituency Election : उमेदवार शिक्षक की संस्थाचालक यावरून रंगणार 'राजकारण'

Teacher Constituency Election : शिक्षक लोकशाही आघाडीत उमेदवार कोण यावरून चांगलेच घमासान सुरू झाले आहे. दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
sandeep gulave vs bhausaheb kachare
sandeep gulave vs bhausaheb kacharesarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 26 May : लोकसभा निवडणुकांची ( lok Sabha Election 2024 ) प्रक्रिया संपण्याआधीच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ( Nashik Division Teacher Constituency Election ) जाहीर झाली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अनेक इच्छुक कामाला लागले आहेत. यात प्रामुख्याने शिक्षक लोकशाही आघाडी 'टीडीएफ' ही संघटना प्रमुख आहे. नाशिकमधून काँग्रेस नेते आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गुळवे हे गेले वर्षभर तयारी करत आहेत. नगर येथील शिक्षक भाऊसाहेब कचरे इच्छुक आहेत. या दोघांनीही 'पीडीएफ' संघटनेकडे उमेदवारी मागितली होती. याबाबत कोणाला उमेदवारी द्यावी यावरून संघटनेत मोठी खलबते सुरू झाली आहेत.

या संदर्भात शनिवारी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच 'हमरी तुमरी' झाली. उमेदवारी शिक्षकाला द्यावी की संस्थाचालकाला यावरून मतभेद समोर आले. या वादविवादात काही काही पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आमदार शिक्षकच असावा आग्रह धरत भाऊसाहेब कचरे ( Bhausaheb Kachare ) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यावरून कार्यकारिणीत दोन गट पडले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांनी मात्र कचरे यांनी यापूर्वी अनेकदा 'टीडीएफ'च्या उमेदवाराविरुद्ध उमेदवारी केली. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. निवडणुकीत मतविभागणी करीत त्यांनी 'टीडीएफ'ला अडचणीत आणले. त्यामुळे संघटनेच्या ध्येय धोरणात कचरे यांची उमेदवारी बसत नाही. संदीप गुळवे ( Sandeep Salave ) यांना नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी एकमताने उमेदवारी जाहीर केली आहे, असे घोषित केले.

शिक्षक लोकशाही आघाडीत उमेदवार कोण यावरून चांगलेच घमासान सुरू झाले आहे. दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 'टीडीएफ'च्या एका गटानं जाहीर केलेले उमेदवार गुळवे हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे.

या आघाडीतील दुसरा महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहेत. अशा परिस्थितीत उमेदवार कोण? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि अन्य काही राजकीय आघाड्यांकडून देखील उमेदवार देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com