BJP Vs NCP : राहुल ढिकले यांच्या विरोधात शरद पवार कोणाला विधानसभेच्या रिंगणात उतरवणार?

BJPs Rahul Dhikale Vs Sharad Pawars NCP : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अतिशय नियोजनपूर्वक निवडणूक लढविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
Rahul Dhikale, Sharad Pawar
Rahul Dhikale, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 7 july : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अतिशय नियोजनपूर्वक निवडणूक लढविण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील. महायुतीच्या नेत्यांनी तशी घोषणा केली आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नाशिक पूर्व मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल.

येथील विद्यमान आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांची उमेदवारी ही निश्चित मानली जाते. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे देखील उमेदवारीसाठी महायुतीकडे प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत दर निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या महाविकास आघाडीला येथे उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल असे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) मोठ्या फरकाने विजयी झाले. मात्र त्यांना आमदार ढिकले यांच्या नाशिक पूर्व मतदारसंघात आघाडी घेता आली नाही. येथे महायुतीला दहा हजार चारशे मतांची आघाडी होती. लोकसभेचे चित्र विधानसभेला कायम ठेवण्यासाठी आमदार ढिकले यांनी नियोजन पूर्वक मतदारसंघाची बांधणी केली आहे. अशा स्थितीत भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेला नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय डाव टाकतो याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Rahul Dhikale, Sharad Pawar
Kishor Darade Vs Vivek Kolhe : किशोर दराडे जिंकले, चर्चा मात्र विवेक कोल्हेंच्या दमदार लढतीची

आगामी निवडणुकीसाठी नाशिक (Nashik) पूर्व मतदारसंघावर शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दोघांकडूनही दावा केला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे भारत प्रतिभूती मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे हे प्रबळ दावेदार मानले जातात. आडगाव येथील तरुण उद्योजक अतुल मते यांचेही संभाव्य उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे.

गोडसे आणि अतुल मते या दोघांनीही आपल्या क्षमतेप्रमाणे मतदारसंघात संपर्क दौरे सुरू ठेवले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व मतदारसंघ भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक यंत्रणा, माजी नगरसेवकांची मोठी संख्या तसेच गुजराती आणि भाजपला मानणाऱ्या मतदारांची संख्या येथे लक्षणीय आहे.

भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कसा भेदणार? याचीच उत्सुकता आहे. त्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी राजकीय डावपेच टाकण्यात आले आहेत. शहरातील सर्वात रंगतदार निवडणूक येथे होण्याची शक्यता आहे.

Rahul Dhikale, Sharad Pawar
Sanjay Raut : संजय राऊत 500 कोटींचा घोटाळा विसरले? काय आहे कारण?

पंचवटी, मसरूळ आणि औरंगाबाद रोड हा नाशिक शहराचा तर जेलरोड आणि देवळाली गाव हा नाशिक रोड परिसराचा या मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळे संमिश्र मतदार आणि संस्कृती असलेल्या नाशिक पूर्व च्या निवडणुकीत विद्यमान आमदार ढिकले कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com