Farmers Politics: कर्जमाफीचे आंदोलन पेटणार, निफाडच्या शेतकऱ्यांनी घरांवर फडकवले काळे झेंडे!

Loan waiver protest Maharashtra : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर महायुतीचे सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते.
Farmers Politics
Farmers Politics Sarkarnama
Published on
Updated on

Nifad News: कर्जमुक्तीचं आंदोलन राजकीय पक्षांनी हाती घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यासाठी नाशिकमध्ये मोठे आंदोलन केले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर महायुतीचे सरकारने कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते.

आता या प्रश्नावर नाशिकमध्ये शेतकऱ्यांनीच मोठे आंदोलन (Farmers Protest) करण्याचे संकेत दिले आहेत. यापूर्वी कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी घरावर काळे झेंडे फडकवले होते. आता त्याचे लोन निफाड तालुक्यात पोहोचले आहे.

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न केल्याने महाराष्ट्र शासनाचा निषेध म्हणून निफाड तालुक्यानंतर कळवण तालुक्यात शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर व घरांवर काळे झेंडे लावायला सुरुवात केली आहे यासाठी शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे मोती नाना पाटील यांनी गावोगावी जनजागृती सुरू केली आहे

Farmers Politics
Election Commission: एकीकडे राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं वादळ; तिकडे निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई; राजकीय पक्षांमध्ये खळबळ

कळवण तालुक्यात सर्वप्रथम बेजेतील शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष देविदास अण्णा पवार यांनी आपल्या घरावर घरासमोर व शेतात काळा झेंडा लावून शासनाचा निषेध नोंदवला व कळवण तालुक्यात झेंडे लावण्यास सुरुवात केली.

देविदास पवार यांनी सांगितले की, विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये शेतकऱ्यांचे वीस हजार रुपये शेअर्स नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून आहेत त्या शेअरच्या रकमा शेतकऱ्यांना तात्काळ परत कराव्यात किंवा त्या शेअरच्या रकमेवर व्याज द्यावे.

Farmers Politics
Rajaram Bapu Patil: राजारामबापू पाटील यांना किती मुलं? जयंत पाटील आहेत राजकारणात पण, इतर काय करतात?

कळवण तालुक्यामध्ये बेज बरोबर भेंडी येथे मनोज रौंदळ, मुळाने येथील धनराज महाले, रवींद्र महाले ,अशोक महाले, सईबाई रौंदळ, आशाबाई रौंदळ भेंडी, संदीप आहेर, रवींद्र आहेर, मीराबाई आहेर ,उषाताई आहेर, यांनी आपल्या घरांवर काळे झेंडे लावून राज्य शासनाचा निषेध नोंदवला आहे व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जातून मुक्त करावे असे यावेळी थकबाकीदार शेतकऱ्यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुरू केलेली सक्तीची वसुली तात्काळ बंद करावी व शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर नावे लावण्याचे तात्काळ थांबविण्यात यावे असे भगवान बोराडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com