Nashik Graduate Constituency Election : खडसे अॅक्शन मोडवर : नाशिक पदवीधरची गणितं बदलणार?

Shubhangi Patil : मुक्ताईनगरातून शुभांगी पाटील यांना 'माहेरची साडी!'
Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil Eknath Khadse
Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अधिकाधिक रंगतदार होत जात आहे. निवडणुकीत वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसच्या विपरित जाऊन अपक्ष उमेदवारी दाखल केली. तर शुभांगी पाटील (Shibhangi Patil) सुरूवातीला भाजपकडून इच्छुक होत्या, भाजपकडून एबी फॉर्म मिळणार नाही हे लक्षात येताच त्या मातोश्रीवर पोहचल्या, यानंतर त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा मिळाला. शुभांगी पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेतली.

Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil Eknath Khadse
Parbhani Politics : अखेर ती शंका खरी ठरली: परभणीत शिंदे गटाचा पुन्हा विरोधांना झटका

शुभांगी पाटील यांच्या बाजूने ठाकरे गटासोबतच आता महाविकास आघाडी ही भक्कमपणे उभी असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाटील यांनी आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची भेट घेतली. जळगाव येथील मुक्ताई नगरच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी पाटील म्हणाल्या, मुक्ताईनगर येथे येऊन मी माहेरीच आले असे मला वाटलं, मला माहेरची साडी भेट मिळाली, असे पाटील म्हणाल्या.

Nashik Graduate Constituency Election Shubhangi Patil Eknath Khadse
N V Ramana : ठाकरे-शिंदे संघर्षांची सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशांचा असा ही एक विक्रम !

एकनाथ खडसे यांची मुक्ताईनगर येथे भेट घेतल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाल्या, ‘ नाथाभाऊंनी मला आशिर्वाद दिला आहे. माहेरी आलेल्या आपल्या मुलीला नाथाभाऊंनी माहेरची साडी भेट दिली आहे. आई-वडिलांकडून जो मिळतो,तसाच आशीर्वाद मला नाथाभाऊंकडे मिळाला आहे, त्यामुळे माझ्या यशाची वाट आता सुकर होणार आहे, असे पाटील म्हणाल्या.

मी एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेतला आहे. पदवीधरांच्या समस्या, त्यांचे प्रश्न यावर आता लक्ष देणार आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे आहे, असे शुभांगी पाटील म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com