Satyajeet Tambe : राजकारण नाही, तर राजकारणी बिघडलेत; विधान परिषदेतील कामकाजावर आमदार तांबेंची टिप्पणी

Nashik Graduate Constituency MLA Satyajeet Tambe Maharashtra Legislative Council : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषद सभागृहातील बेशिस्तपणाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कारभारात केलेल्या बदलांचे कौतुक करताना, दुसरीकडे राजकारण बिघडलं नाही, मात्र राजकारणी बिघडलेत, अशी सध्याची परिस्थिती असल्याची गंभीर टिप्पणी आमदार तांबे यांनी केली आहे.

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी मी सभागृहात नवीन सदस्य आहे. माझा अनुभव अद्यात कमी आहे. मात्र जुन्या सदस्यांच्या अनुभवातून कारभारात बेशिस्तपणा आला आहे, असे दिसते. याला सध्याची राजकीय परिस्थिती जबाबदार असल्याचे दिसते. राजकारण बिघडलं नाही, मात्र राजकारणी बिघडलेत, अशी सध्याची परिस्थिती आहे, असे निरीक्षण नोंदवले.

Satyajeet Tambe
Top 10 News : शिंदेंवर गाणं, कामरावर गुन्हा, आदित्य ठाकरेंची काडी, अजितदादादांच्या मदतीला फडणवीस - वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य कारभारात अनेक बदल केले आहेत, त्याचे स्वागत आहे. असे कौतुक करताना, कारभारात महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा देखील सभागृहात होत असते. येणाऱ्या काळात चांगलं सरकार महाराष्ट्राला मिळेल, अशी मला आशा असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटले.

Satyajeet Tambe
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

CBSC पॅटर्नबाबत मोठी मागणी

राज्यातील शाळांमध्ये CBSC पॅटर्न लावण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. त्यावर हा निर्णय चांगला आहे. मात्र सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला पाहिजे. सध्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा भाग आहे. पण CBSC अभ्यासक्रमात हा इतिहास कितपत असेल, हे अद्याप आम्हाला माहीत नाही. जोपर्यंत सगळं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत अंमलबजावणी करू नये, अशी मागणी असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

शैक्षणिक धोरण कसं हवं

नवीन शिक्षण मंत्री आले की नवीन धोरण होत असते. अधिकारी देखील नवीन आला, तर तो नवीन धोरण राबवत असतो. मात्र राज्याचे शैक्षणिक धोरण हे एकमेव असले पाहिजे. पुढील दहा वर्ष लक्षात घेऊन शिक्षणाचे धोरण ठरवलं पाहिजे, अशी सरकारकडे मागणी आहे, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com