Nashik Graduate Election News : राज्यात पाच ठिकाणी विधानसभेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. यात बाद मतांमुळे निकालाचे गणित काही ठिकाणी बदलले. यानिमित्तान मते बाद कशामुळे होतात, या मुद्या सध्या चर्चेत आहेत. (Nashik Graduate Constituency Election Result news)
अशिक्षित मतदारांकडून अशा प्रकारच्या चुका होतात, हे एकवेळ मान्य करता येतील पण पदवीधर मतदारांचे काय ? त्यांच्याकडून अशा प्रकारे चुका अपेक्षीत नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहेत.
पदवीधराची, सुशिक्षितांची निवडणूक म्हणून ओळख असलेल्या निवडणुकीत तब्बल १२ हजार ९९७ मते बाद झाली आहेत. पदवीधर असलेल्या मतदारांचे मत बाद कसे होते, अशी विचारणा सध्या होत आहे.
पदवीधर मतदार हे अज्ञानी, अशिक्षित आहेत का, असा प्रश्न सध्या सोशल मीडियातून विचारण्यात येत आहे. विशेषतः नाशिकमध्ये १३ हजार मते बाद झाली. मतदानाच्या सुमारे वीस टक्के मते बाद ठरल्याने यातून पदवीधरांचे अज्ञान दिसून येते. यावरुन नेटकऱ्यांनी या पदवीधर मतदारांना चांगलेच सुनावलं आहे.
मतदान केंद्राबाहेर मतदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाही लावण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मतमोजणी दरम्यान बाद झालेल्या मतपत्रिकेवरून पदवीधरांचे अज्ञान समोर आले आहे.
पदवीधर मतदारांचे कारनामे..
काही मतपत्रिकांवर तर चक्क कविता, शेरोशायरी लिहिण्यात आल्या होत्या.
अनेक मतदारांनी सर्वच उमेदवारांपुढे एक हा पसंतीक्रम दिल्याचे दिसून आले.
काहींनी चूक आणि बरोबरच्या चिन्हाचा वापर केलेला दिसून आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.