Satyajeet Tambe Devendra Fadnavis friendship : देवेंद्र फडणवीसांबरोबर मैत्री कशी झाली? भाऊ राजीव राजळेंच्या आठवणीनं सत्यजीत तांबे गहिवरले

Nashik Graduates Constituency MLA Satyajeet Tambe remembers late Congress MLA Rajeev Rajale while acknowledging his friendly ties with BJP Devendra Fadnavis : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी दिवंगत नेते राजीव राजळे यांच्या आठवण उजाळा दिला.
Satyajeet Tambe Devendra Fadnavis friendship
Satyajeet Tambe Devendra Fadnavis friendshipSarkarnama
Published on
Updated on

BJP Congress Maharashtra politics : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेली पहिली भेट, पुढं मैत्री कशी झाली हे सांगताना, भाऊ दिवंगत नेते राजीव राजळे यांच्या आठवणीनं गहिवरले.

काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत नेते राजीव राजळे युवकांमध्ये लोकप्रिय होते. आमदार सत्यजीत तांबे जसे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे, तेच नातं राजीव राजळे यांचे थोरातांशी होते. थोरात यांची भाचेसून म्हणजे, राजीव राजळे यांची पत्नी मोनिका राजळे भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभेचं प्रतिनिधीत्व करतात.

राजीव राजळे आणि सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे मावस बंधू. भाऊ जरी असले, तरी दोघांमध्ये भावापेक्षा मैत्री घट्ट होती. राजीव राजळे उच्च शिक्षित. आर्किटेक्चर झालेले. पण त्यांनी कधी उच्च शिक्षणाचा अभिमान बाळगला. गावच्या समाजकारणात त्यांना अधिक रस होता. गावातील राजकारण ते जमिनीवर मांडी घालून करायचे, अशी आठवण सांगताना आमदार सत्यजीत तांबे यांना गहिवरून आलं.

भाजप (BJP) नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आलेला संपर्क आणि पुढं झालेली मैत्री हे सांगताना, राजीव राजळे यांच्यामुळेच देवेंद्र यांच्याशी संपर्क आल्याचं आमदार तांबे यांनी सांगितलं. राज्यात यूथ फोरम आमदार म्हणून ग्रुप आहे. या ग्रुपचे संस्थापक देवेंद्र फडणवीस आहेत. या ग्रुपमध्ये निवडून येणारा युवा आमदार इन होतो, तर पडणारा आमदार बाहेर पडतो. या ग्रुपमुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आल्याचे सत्यजीत यांनी सांगितले.

Satyajeet Tambe Devendra Fadnavis friendship
Satyajeet Tambe on Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कामात दिसते काँग्रेस नेत्याची 'झलक'; सत्यजीत तांबे म्हणाले, 'लिडर असावा तर...'

भाऊ राजीवबरोबर यूथ कार्यक्रमांना हजेरी

या यूथ फोरममुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध जो आला, ते सांगताना, सत्यजीत तांबे यांना त्यांचे भाऊ राजीव राजळेंची आठवण आली. 'भाऊ राजीव राजळे या यूथ फोरममध्ये होते. राजीवभाऊ फोरमच्या कार्यक्रमाला जायचो. त्यावेळी मी देखील त्यांच्याबरोबर जायचो. त्यातून फडणवीस यांच्याबरोबर संपर्क आणि पुढं मैत्री झाली', असे आमदार तांबे यांनी सांगितलं.

Satyajeet Tambe Devendra Fadnavis friendship
Satyajeet Tambe Congress : 'राहुल गांधींना एक तासांत भेटून दाखवावं'; सत्यजीत तांबेंचं प्रदेशाध्यक्ष सपकाळांसह राज्यातील काँग्रेस नेत्यांना चॅलेंज

राजीवभाऊ फॅक्टर

'राजीवभाऊ यांची पदोपदी आठवण येते, राजीवभाऊ परदेशात फिरायचा, त्याला उत्तम प्रकारच्या जेवणांची माहिती होती, पदार्थांची माहिती आहे, पहिल्यांदा इटालियन कुणी खाऊ घातलं असेल, तर त्यानं मला खाऊ घातलं. पास्ता काय असतो? पिझ्झा काय असतो? पिझ्झा सर्वांना माहिती आहे. पण पास्ता रेड किंवा व्हाईट एवढंच माहिती असते. आता पिंक पास्ता माहिती होऊ लागला आहे. पण हे राजीवभाऊमुळे वीस वर्षांपू्र्वीच पास्ता खाल्ला आहे. चांगल फूट खाणं यामागे फक्त राजीवभाऊ फॅक्टर आहे', असे आमदार तांबे यांनी सांगितले.

राजकारणात डिनर डिप्लोमेसीला महत्त्व

'संगीत, वाचन करताना, गावातील राजकारण जमिनीवर मांडी घालून करायचा, कधी त्याला उच्च शिक्षणाची भावना नव्हती, आर्किटेक्चर आहे, मला जगाचं माहिती आहे, त्याचा कधीही त्यानं गवगवा केला नाही. खाद्यसंस्कृती ही राजकारणाचं एक भाग आहे. राजकारणात डिनर डिप्लोमेसी खूप महत्त्वाची असते. कार्यकर्ते किंवा राजकारण्याच्या घरी जाऊन जेवण करतो, त्यातून जे बाॅडिंग तयार होते, ते फार महत्त्वाचे असते. त्यामुळे डिनर डिप्लोमेसीचे महत्त्व जगाच्या राजकारण आहे', असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

राजळेंच्या राजकारणाची सुरुवात

राजीव राजळे 1999 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी राजकारणात आले. राजळे यांनी युवा काँग्रेस प्रचारक म्हणून सुरुवात केली. त्याच वर्षी ते निवडणूक लढले. परंतु त्यांचा पराभव झाला. 2004 मध्ये ते राज्य विधानसभेवर निवडून आले. ते शेतकरी आणि तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. विविध क्षेत्रातील कलाकारांना आमंत्रित केले आणि त्यांचा सन्मान केला. त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली. 7 ऑक्टोबर 2017 रोजी वयाच्या 48 व्या वर्षी मुंबईत दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com