Satyajeet Tambe : आमदार तांबेंचं राजकीय वाटचालीवर मोठं विधान; म्हणाले, 'लाइन क्रॉस' करणारच...'

Nashik MLA Satyajeet Tambe Balasaheb Thorat is My Political Leader Sangamner Congress News : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आगामी काळात राजकीय वाटचाल कोणाच्या नेतृत्वाखाली करणार, यावर संगमनेरमध्ये मोठं भाष्य केलं.
Satyajeet Tambe 1
Satyajeet Tambe 1Sarkarnama
Published on
Updated on

Sangamner Congress news : नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी आगामी काळात आपली राजकीय वाटचाल कशी राहणार आहे, याचे स्पष्ट संकेत दिले.

काँग्रेसवर प्रचंड नाराज असलेले आमदार तांबे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळ गेल्याची चर्चा आहे. या चर्चांना आमदार तांबेंनी, 'राजकारणात मामाच, अर्थात काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्यासाठी सर्वेसर्वा आहे', असे सांगून संगमनेरमधील चर्चांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘माझ्यात आणि मामांमध्ये कुठेही दुरावा नाही. मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही, जाणारही नाही. हे माझे आयुष्यभराचे तत्त्व राहणार आहे', असे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे आणि माजी मंत्री थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या; मात्र या चर्चांना आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून पूर्णविराम देण्यात आला.

आमदार तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले, ‘माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा माझे कुटुंब, माझे नाते आणि त्यांचा सन्मान मला अधिक महत्त्वाचा वाटतो. मी कधीही कुटुंबाची रेषा ओलांडून राजकारण करणार नाही, हे मी राजकारणात प्रवेश करतानाच ठरवले आहे'. सध्या काही पक्षीय चर्चांमुळे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आमचे वैयक्तिक व कौटुंबिक संबंध प्रेमाचे, विश्‍वासाचे आणि दृढ आहेत. कोणीही ते दूषित करू शकत नाही. राजकीयदृष्ट्या मी कधीही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची लाइन क्रॉस करणार नाही आणि इथून पुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत राहीन', असे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.

Satyajeet Tambe 1
Nilesh Lanke Call Ajit Pawar : शरद पवारांच्या शिलेदाराचा अजितदादांना थेट दिल्लीतून फोन; म्हणाला...

'माझा आणि माझ्या वडिलांचा राजकारणात प्रवेश हा केवळ बाळासाहेब थोरात यांना, म्हणजेच माझ्या मामांना मदत करण्यासाठी झाला आहे. आमच्यापेक्षा त्यांची महत्त्वाकांक्षा आम्हाला अधिक महत्त्वाची वाटते', असेही आमदार तांबे यांनी म्हटले. आमच्यात दुरावा निर्माण होण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. ते आमच्या कुटुंबाचे आणि राजकीय आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या मार्गाशी विसंगत पाऊल उचलण्याचा प्रश्‍नच नाही', असे सांगून सत्यजीत तांबे यांनी आगामी राजकारणाची दिशा सूचक अशी स्पष्ट केली.

Satyajeet Tambe 1
Shirdi Grow More scam : 'ग्रो-मोअर'चा 350 कोटींचा घोटाळा; 'LCB'च्या 'PSI'सह तिघा पोलिसांनी कोटी उकळले, मंत्री विखेंचा चौकशीचा आदेश

आमदार तांबे यांचे हे वक्तव्य केवळ राजकीय मतप्रदर्शन नसून, राजकारणात नात्यांचा सन्मान आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक कशी करावी, याचे आदर्श उदाहरण ठरते. यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरणातील संभ्रम दूर होण्यास मदत झाल्याचे निरीक्षण संगमनेरमधील स्थानिक थोरात आणि तांबे समर्थकांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com