Nashik Honeytrap Case: नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणाने पोलीस यंत्रणेची उडाली झोप? हे आहे कारण...

Senior Nashik Police Officers Involved in Honeytrap Scandal: नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणात बहुतांशी वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याच्या चर्चेने यंत्रणेची धावपळ.
Honeytrap scandal in Nashik
Honeytrap scandal in NashikSarkarnama
Published on
Updated on

Impact of Honeytrap on Nashik Police: नाशिकच्या उच्चभ्रू नेत्याशी संबंधित हनीट्रॅप प्रकरण अनेकांच्या अंगाशी येण्याची चिन्हे आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी राजकीय नेते अडकले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वाच्यता होऊ नये, यासाठी संबंध पोलीस यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

नाशिक शहरातील एका उच्चभ्रू राजकीय नेत्याच्या हॉटेलमध्ये हा प्रकार गेले काही वर्ष सुरू असल्याचे उघड झाले आहे. हे प्रकरण एव्हढे गोपनीय ठेवण्यात आले आहे की बहुतांशी पोलिसांनाही त्याची माहिती नाही. पत्रकारांना देखील ही माहिती एका मोठ्या राजकीय नेत्याकडून वाच्यता झाल्याने समजली.

संबंधित हॉटेल आणि त्याच्या संचालकांशी राज्यातील बहुतांशी वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित आहेत. नाशिकमध्ये कार्यरत असताना हा हनीट्रॅप कार्यान्वित होता. त्यामुळे सध्या ठाणे, मुंबई, मंत्रालय, नागपूर आणि विविध ठिकाणच्या उच्च पदावरील पोलीस अधिकारी यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत.

Honeytrap scandal in Nashik
Ajit Pawar Dominance: नाशिक जिल्हा परिषदेवर निकालाआधीच अजित पवारांचे वर्चस्व? भाजप कोंडीत सापडणार!

या संदर्भात ठाणे पोलिसांकडे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर तक्रार देण्यात आली. या पोलिस अधिकाऱ्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे बोलले जाते. हा प्रकार समजतात वरिष्ठ पोलीस अधिकारी सक्रिय झाले. त्यांनी ही तक्रार दाखल होऊ नये यासाठी आपली शक्ती वापरल्याचे उघड झाले आहे.

या संदर्भात नाशिकसह तीन तक्रारी पोलिसांत आल्याचे बोलले जाते. यातील तक्रारी आणि तक्रारदार याबाबत संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाही दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना याबाबत कोणतीच माहिती नसल्याने प्रत्येक प्रकरणाची खुमासदार चर्चा मात्र पोलीस यंत्रणेत सुरू आहे.

हनीट्रॅपचा बाटलीतला जीन बाहेर आल्यास त्यात राज्य सरकारमधील काही मंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यात अडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हे प्रकरण दाबण्यासाठी अर्थात जीन असलेल्या बाटलीचे बुच घट्ट बंद करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील पोलिसांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणातील हनीट्रॅप मधील तरुणी संबंधित हॉटेल संचालकांसमवेत वावरते. नाशिक सह मुंबई आणि अन्य ठिकाणीही हा हनी ट्रॅप (Honeytrap) लावला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणाची वाच्यता होऊ नये यासाठी पडद्यामागे तडजोडी आणि वाटाघाटी गेल्या दोन आठवड्यांपासून होत असल्याचे कळते.

या संदर्भात राज्यातील विरोधी पक्ष आणि संबंधित नेते मात्र गप्प असल्याने तो चर्चेचा विषय आहे. राज्य शासनाच्या सबंध पोलिस (Police) यंत्रणेला आणि प्रशासनाला हादरा देणारे या प्रकरणावर विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडे कोणतीच माहिती पोहोचू शकलेली नाही यावर सहजासहजी विश्वास बसण्याची शक्यता नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com