Nashik News : भर सभेत लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवणारे राहुल हांडोरे, विशाल करकसे पोलिसांच्या ताब्यात

Nashik police arrest Rahul Handore and Vishal Karkase for viral Lawrence Bishnoi poster : या दोघांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हातात धरून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले असून त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याविरोधात तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.
Gopichand Padalkar & Lawrence Bishnoi
Gopichand Padalkar & Lawrence BishnoiSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सकल हिंदू समाज प्रणित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने कश्मीरमधील पहेलगाम येथे निष्पाप हिंदू पर्यटकांवर जिहादी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तसेच पश्चिम बंगालमधील हिंदू समाजावर झालेल्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी सिडको परिसरात दोन दिवसांपूर्वी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त घेण्यात आली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष उपस्थिती लावत मार्गदर्शन केले.

या सभेला मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवली होती. सभेला शिवसेनेचे दीपक बडगुजर, भाजपाचे व्यंकटेश मोरे, राहुल आरोटे, देवा वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या सभेमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकविण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली होती. संबंधित प्रकारावर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू ठेवत, नाशिक रोड परिसरातील राहुल हांडोरे व विशाल करकसे यांच्यावर कारवाई केली आहे.

Gopichand Padalkar & Lawrence Bishnoi
Uddhav Thackeray : आपल्या फायरब्रॅण्ड नेत्यावर उद्धव ठाकरेंनी सोपवली 'या' प्रमुख जिल्ह्यांची जबाबदारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो हातात धरून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले असून त्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याविरोधात तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कृती समाजात भय निर्माण करणारी असून अशा प्रकारच्या समाजविघातक कृत्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Gopichand Padalkar & Lawrence Bishnoi
Jalgaon Shiv Sena ghost : अरे बाप ! जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूत? भीतीने कार्यकर्ते फिरकेनात, काय आहे प्रकरण?

या पार्श्वभूमीवर, सभा शांततेत पार पडली असली तरी काही व्यक्तींनी समाजविघातक प्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू ठेवला असून, सोशल मीडियावर असे प्रकार घडू नयेत यासाठी सतर्कता बाळगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com