Nashik Loksabha 2024: नाशिकसाठी भाजपचा हट्ट; शिंदे गटाचाही सूचक इशारा!

Nashik Loksabha Constituency 2024: पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बराच वेळ धरणे धरले. नाशिकचा मतदारसंघ कमळाचाच अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे या कार्यालयात नेमके काय सुरू आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shinde Group News: नाशिक लोकसभेची जागा (Nashik Loksabha constituency 2024) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Shinde Group) सोडण्यात आली आहे. शिंदे गटाने त्यांचा प्रचारही सुरू केला आहे. अशातच भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांनी मतदारसंघ मिळावा, म्हणून दबाव तंत्र सुरू केले आहे. त्यामुळे निवडणूक सुरू होण्याआधीच महायुतीमध्ये तणावाची स्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात प्रदेश सचिव विजय चौधरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत निवडणुकीऐवजी वेगळ्याच विषयावर वादविवाद झाले.

पक्षाच्या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी भाजपने नाशिकची जागा शिंदे गटाला सोडू नये, पक्षाने गेली दोन वर्षे निवडणुकीची तयारी केली आहे. हा मतदारसंघ अन्य पक्षाला का सोडला जात आहे? असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. या विषयावर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या वेळी प्रदेश सचिव चौधरी यांनी हा विषय वरिष्ठ स्तरावरील आहे. याबाबत आपल्याला निर्णय घेता येणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे पोहोचविण्याची व्यवस्था करतो, असे सांगितले. त्यानंतरही पदाधिकाऱ्यांचा राग शांत झाला नाही. नेत्यांकडून समाधान होत नसल्याचे पाहून ही बैठक विचारविनिमयऐवजी घोषणाबाजीनेच रंगली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बराच वेळ धरणे धरले. नाशिकचा मतदारसंघ कमळाचाच अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे या कार्यालयात नेमके काय सुरू आहे. यावरून परिसरातील नागरिकांतही चर्चा रंगली. बैठक झाल्यानंतरही कार्यकर्त्यांनी नाशिकचा मतदारसंघ भाजपला मिळालाच पाहिजे. एकनाथ शिंदे गट व त्यांच्या उमेदवाराची या निवडणुकीसाठी पुरेशी क्षमता नाही, असा दावा केला.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Kolhapur Lok Sabha 2024 मंडलिकांचे के.पी. पाटलांना भावनिक आवाहन, म्हणाले, "झालं गेलं विसरून सहकार्य करा..."

गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचा निवडणूक मेळावा नाशिकमध्ये झाला. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी जाहीर केली. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर उमेदवारी मिळेल या आशेवर असलेल्या भाजपच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली.

या इच्छुकांनी हा मतदारसंघ मिळावा म्हणून स्थानिक व राज्यस्तरावर लॉबिंग केले. यामुळे महायुतीच्या एकनाथ शिंदे गट आणि भाजप यामध्ये विसंवाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद येत्या निवडणुकीवरदेखील पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काल केलेल्या घोषणाबाजीमुळे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमचा प्रचारदेखील सुरू झालेला आहे. आता गटनिहाय चर्चा सुरू आहेत. अशा स्थितीत भाजपने समन्वय बिघडविण्याचे काम करू नये. त्याचे पडसाद आगामी राजकारणावर उमटतील. लोकसभेत जे घडले त्याची पुनरावृत्ती विधानसभेच्या जागावाटपात होऊ शकते हे स्थानिकांनी समजून घ्यावे, असा सूचक इशारा या वेळी शिंदे गटाच्या नेत्यांनी दिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com