Devyani Farande : जायकवाडी पाणीप्रश्न; फरांदेंचा सरकारला सल्ला; मृत साठ्यातून पाच TMC पाणी...

Jayakwadi Dam Water Issue : मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे दर पाच वर्षांनी नियोजन आणि फेर अवलंबन व्हायला पाहिजे.
Devyani Pharande
Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : जायकवाडीला नाशिक आणि नगरमधून पाणी सोडण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष विकोपाला जाताना दिसत आहे. नगर आणि नाशिकमधील राजकीय नेते पाणी सोडण्याच्या विरोधात एकत्र आले आहेत. पाणी न सोडण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत.

भाजप महायुती सरकारमधील नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी पाणी अपव्ययातून होत असलेल्या 2 हजार 400 कोटी रुपयांच्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडी धरणाच्या मृत साठ्यातून पाच टीएमसी पाणी वापरण्याचा सल्लाही आमदार फरांदे यांनी दिला.

गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका आहे. पाणी सोडण्याला न्यायालयाने स्थगिती दिली नसली, तरी पुढची सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत पाणी सोडू नये, असे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

याशिवाय दुष्काळामुळे नाशिकमधून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध कायम आहे. मेंढेगिरी समितीच्या अहवालाचा दर पाच वर्षांनी नियोजन आणि फेर अवलंबन व्हायला पाहिजे. धरणांचा हायड्रोलिक सर्व्हे होऊन त्याच्यामध्ये किती गाळ साठलेला आहे, त्याची पाणी साठवण्याची क्षमता ही कमी झाली आहे का, याचेही अवलोकन सरकारने केले पाहिजे, असे आमदार फरांदे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devyani Pharande
NCP Protest News : 'जीवन प्राधिकरणा'ला टाळे ठोकत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा अभियंत्यांना 'हा' इशारा

दुष्काळी स्थितीत पाणीवाटप संस्थांचे काम महत्त्वाचे ठरते. या मुद्द्याकडे आमदार फरांदे यांनी लक्ष वेधत दोन्ही ठिकाणी पाणीवाटप संस्थांची निर्मिती गरजेची आहे. नाशिक जिल्ह्यात पाणीवाटप संस्था आहे. परंतु मराठवाड्यामध्ये एकही पाणीवाटप संस्था दिसत नाही, याकडे आमदार फरांदे( Devyani Farande) यांनी लक्ष वेधले.

जायकवाडी पाणी सोडताना सरकारचे होत असलेल्या नुकसानीचा ताळेबंद आमदार फरांदे यांनी मांडला. जायकवाडीला 2016 मध्ये नऊ टीएमसी पाणी सोडले होते. त्यातील सहा टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला.

यातून सरकारचे 2 हजार 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे टाळण्यासाठी नांदूर मध्यमेश्वरपासून जायकवाडीपर्यंत थेट पाइपलाइन करावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली. दरम्यान, जायकवाडीमधील मृत पाणी साठ्यातील पाच टीएमसी पाणी वापरून मराठवाड्याची दुष्काळात तहान भागवली जाऊ शकते,असेही फरांदे म्हणाल्या.

Edited By : Mangesh Mahale

Devyani Pharande
Congress Politics : दुष्काळी सवलतीत निवडक शेतकऱ्यांनाच लाभ; काँग्रेसच्या गंभीर आरोपाने खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com