Nashik Graduate Election Result: भाच्याच्या जल्लोषात मामाची कार ; सत्यजीत तांबेचं स्वप्न पूर्ण

Satyajit Tambe Wins Election: ही कार कुणाची आहे, संगमनेर, नाशिक परिसरात बहुतांश लोकांना माहित आहे.
Nashik Graduate Election Satyajit Tambe News
Nashik Graduate Election Satyajit Tambe News sarkarnama
Published on
Updated on

Nashik Graduate Election Satyajeet Tambe News : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून ती 'मामा-भाचे'यांच्याभोवती फिरताना दिसली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीत तांबे हे भाचे.

तांबे यांच्या उमेवारीवरुन बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप करण्यात आले. या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडायला लागल्यानंतर बाळासाहेब थोरात या निवडणुकीपासून लांब राहिले. आता तांबेच्या विजयानंतर हे 'मामा' पुन्हा चर्चेत आले आहे, ते एका वेगळ्या कारणासाठी..

तांबेंनी विजयानंतर MH 17 BX 567 या क्रमांकाच्या कारमधून जल्लोष करीत होते, ही कार कुणाची आहे, संगमनेर, नाशिक परिसरात बहुतांश लोकांना माहित आहे. गुरुवारी रात्री विजयानंतर सत्यजीत तांबे यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. यावेळी तांबे हे ज्या कारमधून आले अन् त्या कारमधूनच त्यांनी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन स्वीकारले ती कार बाळासाहेब थोरात यांची आहे.

Nashik Graduate Election Satyajit Tambe News
Nashik Graduate Election : तांबेंकडून पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाल्या.."ही मतं विकली.."

सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर बाळासाहेब थोरात ही या निवडणुकीपासून अप्लित होते. पण सत्यजीत तांबेंनी मामा बाळासाहेब थोरात यांच्या कारचा वापर करीत या निवडणुकीत प्रचार केला आणि विजय मिळवला आहे. विजयानंतर याच कारमध्ये जल्लोष केला. संपूर्ण निवडणूक प्रचारात मामाची कार वापरुन तांबेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या माध्यमातून संदेश देत आमदार झाले.

Nashik Graduate Election Satyajit Tambe News
Maharashtra MLC Election : तीन विद्यमान आमदारांना नाकारले ; आघाडीला ३ तर, भाजप, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजय

सत्यजित तांबे हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब राजकीय क्षेत्रातच आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचीही विधानपरिषद किंवा विधानसभा येथे जाण्याची अनेक दिवसांपासून इच्छा लपून राहिलेली नाही. ती काल पूर्ण झाली.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्यानिवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल (गुरुवारी) रात्री अधिकृत निकाल जाहीर केला. यात .सत्यजित तांबेंना ६८,९९९ मते मिळाली आहे,तर शुभांगी पाटील या २९,४६५ मतांनी पराभूत झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com