Nashik Municipal Corporation : सगळ्या हरकती फेटाळल्या, नाशिक महापालिकेसाठी जुनीच प्रभागरचना अंतिम

Nashik Municipal Corporation ward structure : नाशिक महापालिकेसाठी जुनीच प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे. सर्व हरकती फेळाटण्यात आल्या आहेत. आता आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Nashik : पावणेतीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुकांना चाल मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी महापालिकेने सादर केलेल्या प्रभागरचनेला अंतिम स्वरूप देताना २०१७ चीच प्रभागरचना कायम ठेवली आहे. आता मतदारयादी पुनरीक्षण व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दोन दिवसांत जाहीर केला जाणार आहे.

२०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपुष्टात आल्यानंतर तांत्रिक कारणांमुळे राज्य शासनाने निवडणुका घेतल्या नाही. जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये निवडणुका घेण्याचे सूचित केले.

त्यानंतरही निवडणुकांबाबत याचिका दाखल झाली. याचिका फेटाळताना न्यायालयाने जानेवारी २०२६ पर्यंत निवडणूक निकालासह प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशित केले. त्यानुसार महापालिकेचा निवडणूक कार्यक्रमाला गती मिळाली. ऑगस्ट महिन्यात प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यात जवळपास ९१ हरकती प्राप्त झाल्या. हरकतींवर स्थळपाहणी करून प्रारूप प्रभागरचनेचा मसुदा शासनाला सादर करण्यात आला. सोमवारी (ता. ६) अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली.(Nashik News)

Nashik Municipal Corporation
Nagaradhyaksha Reservation : नाशिक जिल्ह्यात महिलाराज ! नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर, पाहा कुणाला संधी?

हद्द बदलण्याचे प्रयत्न निष्फळ

२०११ च्या लोकसंख्येनुसार २०१७ मधील अंतिम प्रभागरचना कायम ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परंतु निवडणुका २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या मतदारयादी प्रमाणेच होणार आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यापूर्वी प्रभाग क्रमांक १० मधील आरक्षण बदलण्याचे प्रयत्न झाले. तेथे अनुसूचित जमातीचे आरक्षण प्रभाग क्रमांक तीनमध्ये स्थलांतरित केले जाणार होते. परंतु एक ब्लॉक बदलल्यास संपूर्ण प्रभागरचना बदलावी लागणार असल्याचे कारण देत प्रभाग हद्द बदलण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.

Nashik Municipal Corporation
Nashik Crime : ‘प्रोटेक्शन मनी’पासून गोळीबारापर्यंत, नाशिकमधील माजी नगरसेवक पुत्राच्या अडचणी वाढण्याची शक्यता

२०१७ ची आरक्षण स्थिती

एकूण जागा - १२२

सर्वसाधारण -६२

इतर मागास प्रवर्ग- ३३

अनुसूचित जाती - १८

अनुसूचित जमाती -०९

महिला आरक्षण -६१

अंतिम प्रभागानुसार रचना

एकूण नगरसेवक - १२२

एकूण प्रभाग - ३१

चारसदस्यीय - २९

तीनसदस्यीय - २

२०११ ची लोकसंख्या- १४ लाख ८६ हजार ५३

प्रभाग क्रमांक १५ व प्रभाग क्रमांक १९ तीन सदस्यांचे

उर्वरित प्रभाग चार सदस्यांचे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com