Ajit Pawar: महापालिका निकालांमुळे नाराज अजित पवारांचा नाशिकसाठी होता ‘तो’ खास प्लॅन, मात्र तो दौरा राहूनच गेला...

Nashik NCP Ajit Pawar was going to visit NMC election results and happy workers-महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार झाले होते नाराज
AJit Pawar With Nashik Office bearers
AJit Pawar With Nashik Office bearersSarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. राज्यातील सर्वाधिक सक्रिय नेता आणि कार्यकर्त्यांसाठी धावणारा मंत्री, अशी त्यांची प्रतिमा होती. याबाबत असंख्य आठवणी कार्यकर्त्यांच्या मनात दाटून आल्या.

नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने युती केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आले. श्री पवार यांना हा निकाल अनपेक्षित यश नव्हते.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी नाशिक महापालिकेच्या निकालावर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाली. हे कसे काय घडले? चांगला निकाल का लागला नाही? याची विचारणा पवार यांनी केली होती.

AJit Pawar With Nashik Office bearers
Ajit Pawar Death: अजितदादांशिवाय विधिमंडळ अपूर्ण! एकनाथ खडसे म्हणाले, ‘राज्याच्या नेतृत्वाची क्षमता त्यांच्यात दिसत होती’

पक्षाचे नेते अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगगळे, डॉ. झाकीर शेख, अनिल चौगुले, नवनिर्वाचित नगरसेविका डॉ हेमलता पाटील आदी यावेळी उपस्थित होते. प्रचार आणि निवडणुकीत काय अडचणी आल्या याची उपमुख्यमंत्री पवार यांनी विचारणा केली. निकालाबाबत त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.

AJit Pawar With Nashik Office bearers
Jalgaon Mayor Election: महापौर पदाचा तिढा वाढला; गिरीश महाजन यांच्याकडे जोरदार लॉबिंग!

या निकालाच्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीविषयी देखील त्यांनी विचारणा केली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पाच फेब्रुवारीला दोन दिवसांचा नाशिक दौरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कार्यकर्त्यांशी व्यक्तिशः चर्चा करून त्यांना बळ देऊ असे ते म्हणाले होते.

त्यानंतर तीन दिवसांनी बुधवारी बारामती येथे दुर्दैवी विमान अपघात झाला. त्यामुळे नाशिकच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पवार यांना विशेष रस होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नियमित संपर्कात होते. आता त्यांचा दौरा कधीच होणार नाही, ही खंत महापालिका निवडणूक समितीचे सदस्य डॉ शेख यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक राजकीय चढउतार अनुभवले होते. प्रत्येक आव्हानाला ते तेवढ्याच आक्रमकपणे आणि तयारीनिशी सामोरे जात असत. त्यांच्या या कार्यशैलीमुळेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आत्मविश्वास मिळत असे. त्या दृष्टीने त्यांनी नाशिकचा दौरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काळाच्या दुर्दैवी अडथळ्यांमुळे हा दौरा राहून गेला, अशी खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com