Bhujbal on Jarange : 'उगीच हवेत काहीही बोलायचं'; भुजबळांनी जरांगेंना सुनावलं

NCP Chhagan Bhujbal Manoj Jarange Jalna Nashik : मनोज जरांगे बीड घटनेतील संदर्भात करत असलेल्या चुकीच्या विधानांवरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
Bhujbal on Jarange
Bhujbal on JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics today : मनोज जरांगे यांनी बीडमध्ये होत असलेल्या घटनांवरून केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनावलं.

'उगीच हवेत काहीही बोलाण्यात अर्थ आहे का? आता ते सध्या आराम करत आहेत. माध्यमांचे देखील त्यांच्याकडे लक्ष नाही, मग लक्ष वेधण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट करायची', असा टोला भुजबळांनी जरागेंना लगावला.

छगन भुजबळ येवला (जि. नाशिक) इथं पत्रकार परिषद घेतली. राज्याच्या राजकारणात बिघडलेल्या सुसंस्कृतपणावर भाष्य केले. टोकाचं राजकारण राज्यात कधीही पाहिलं नाही. पण आता एक घाव, दोन तुकडे असं राजकारण होऊ घातलं आहे. चर्चाच होत नाही, अशी शोकांतिका व्यक्त केली. बीड (BEED) जिल्ह्यातील राजकीय गुन्हेगारीवर भाष्य करताना, मनोज जरांगेंना करत असलेल्या आरोपांवरून चांगलेच सुनावले.

Bhujbal on Jarange
Chhagan Bhujbal : पवार कुटुंबासाठी ओठावर आलंच; छगन भुजबळ प्रयत्न करणार?

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, "वाल्मिक कराडने मर्डर केलेत, कुणाचे मर्डर केलेत, काय मर्डर केलेत, उगीच हवेत काहीही बोलण्यात अर्थ आहे का? त्याने काय मर्डर केले असतील, त्याचे नाव, गाव काही आहे का? त्याची संपूर्ण माहिती द्या ना! आता ते सध्या आराम करत आहेत. माध्यमांचे देखील त्यांच्याकडे लक्ष नाही, मग लक्ष वेधण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट करायची. मला असं वाटतं की, त्यांना जे काही माहिती आहे, त्यांनी पोलिस कमिशनर, पोलिस अधीक्षकांना सांगाव. तुमचं म्हणणं खरं असेल, तर होईल कारवाई".

Bhujbal on Jarange
Water Issue News : सत्ताधाऱ्यांनी वाट लावली, प्रशासनातील सनदी अधिकाऱ्यांनीही पाण्याचे बारा वाजवले!

"राजकीय टीका टिपणी करतांना पहिल्यासारखा सुसंस्कृतपणा राहिला नसल्याचे निरीक्षक नोंदवत, 40 वर्षांपूर्वी असे नव्हते, त्यावर चर्चा व्हायची. एखादा कायदा आला तर त्यावर सखोल चर्चा व्हायची. सर्वजण एकत्र बसून चर्चा करायचे. विरोधीपक्ष म्हणून बघितले जायचे, दुश्मन म्हणून नाही. सभागृहात भांडणे नंतर एकत्र चहा व्हायचा", अशा आठवणी भुजबळांनी सांगितल्या.

"वाजपेयी स्वतः म्हणाले होते, राजीव गांधी यांच्यामुळे मी वाचलो, हे विरोधी पक्षाच्या नेत्याने मांडले होते. काळजी, आपुलकी पोटी सर्व बघितले जायचे. पवारसाहेब आजही सर्वांना मदत करतात. सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात, त्याकाळी प्रेम होते. आता सर्वच क्षेत्रात विरोध सुरू झाले आहे, अगदी मीडियात सुद्धा", असं गंभीर निरीक्षण छगन भुजबळांनी नोंदवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com