Chhagan Bhujbal On Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकटेंच्या वादग्रस्त विधानावर दोन प्रश्न; छगन भुजबळांचं उत्तर... (VIDEO)

Krishi Mantri Manikrao Kokate NCP Nashik Chhagan Bhujbal : कृषिमंत्री माणिकराव कोकटे यांच्याविषयी प्रश्न विचारताच नाशिकमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दोन शब्दात उत्तर दिलं.
Chhagan Bhujbal On Manikrao Kokate
Chhagan Bhujbal On Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political news : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे राज्यात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी संघटनांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीय.

महायुतीमधील राष्ट्रवादीचा मित्रपक्षातील भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरासावरी करत, माफी देखील मागितली आहे. यावर त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीवर जे नियमितपणे कर्ज भरतात, त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट बघायची. पण कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असे म्हटले.

Chhagan Bhujbal On Manikrao Kokate
Yogesh Kadam mobile missing : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना 'बीड'चा झटका; मोबाईल 'मिसिंग' की?

मंत्री कोकाटे यांच्या या विधानावरून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी महायुती सरकारवर निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री कोकाटेंच्या विधानावर सडकून टीका केली. कृषिमंत्री कोकाटे यांची असंवेदनशील यातून दिसली. बहुमत असल्याने ते अरेरावीची भाषा करीत आहेत, असा टोला देखील लगावला.

Chhagan Bhujbal On Manikrao Kokate
Manikrao Kokate : कृषिमंत्रीसाहेब, पोशिंद्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे धाडस कुठून आले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य तथा नेते छगन भुजबळ यांना मंत्री कोकाटे यांनी केलेल्या संदर्भात दोन प्रश्न विचारल्यावर, त्यांनी दोन्ही प्रश्नांवर एका-एका शब्दात प्रतिक्रिया दिली. 'नो-कमेंट्स' एवढीच ही प्रतिक्रिया होती. भुजबळांची ही प्रतिक्रिया म्हणजे, पक्ष आणि पक्षातील नेतृत्वावर त्यांची असलेली कमालीची नाराजी, दर्शवते.

भुजबळांना विचारलेले दोन प्रश्न...

आपण मंत्री असताना, शेतकर्‍यांसाठी बांधावर मदतीसाठी धाऊन गेला. पण आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आहेत. आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. यावर जयंत पाटील यांनी कृषिमंत्री सत्तेत मशगूल आहे, असा टोला लगावला आहे. त्यावर भुजबळ यांनी 'नो-कमेंट्स' असे म्हटले आहे. तसेच कर्जमाफीच्या पैशावरून काय केलं जात, नुकसान ग्रस्तांची अजून पाहणी नाही, या प्रश्नावर देखील भुजबळांनी 'नो-कमेंट्स' एवढेच उत्तर दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com