Sinhastha KumbhMela: आयुक्त मनीषा खत्री उतरल्या रस्त्यावर; निकृष्ट रस्ता जेसीबीने तोडला, कंत्राटदाराला ठोठावला जागेवरच दंड!

Manisha Khatri takes action on poor quality road: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी महापालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री गुणवत्तेच्या तपासणीसाठी थेट रस्त्यावर उतरल्याने ठरला चर्चेचा विषय.
Manisha Khatri nashik road inspection
Manisha Khatri nashik road inspectionSarkarnama
Published on
Updated on

Commissioner Manisha Khatri fines contractor on site: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे शहरभर सुरू आहेत. कामांमध्ये घाई गडबडीत गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासन मात्र या संदर्भात आता चांगलेच सक्रिय झाले आहे.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांविषयी चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. बुधवारी त्यांनी तक्रारी येतात रस्त्यावर जाऊन कामांची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला तडे गेल्याचे आढळल्याने त्या कंत्राटदारावर चांगल्याच भडकल्या. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही यावेळी कंत्राटदाराला फैलावर घेतले.

त्र्यंबक रस्त्याचे काम तपासताना एका ठिकाणी रस्त्याला तडे गेल्याने तो निकृष्ट असल्याचे आढळले. यासंदर्भात तातडीने शहर अभियंत्यांसमवेत कंत्राटदाराची झाडाझडती करण्यात आली. त्यानंतर महापालिकेचा जेसीबी आणून निकृष्ट भाग तोडण्यात आला. गुणवत्तापूर्ण काम नसल्यास त्यावर बुलडोझर चालविण्यात येईल, अशी तंबी यावेळी देण्यात आली.

Manisha Khatri nashik road inspection
Maharashtra News Live Update : पुण्यात शिवसैनिकांमध्ये राडा, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

नव्याने केलेला २५ मीटर लांबीपर्यंतचा रस्ता निकृष्ट असल्याने त्याला तडे गेले होते. त्यामुळे तो तोडण्यात आला. एवढ्यावरच न थांबता कंत्राटदाराला १.८४ लाखांचा प्रतिदिन दंड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच कंत्राटदाराला यापूर्वी ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला होता. त्यानंतरही त्याच्या कामकाजात सुधारणा झाली नसल्याचे आढळले आहे.

Manisha Khatri nashik road inspection
Maharashtra News Live Update : पुण्यात शिवसैनिकांमध्ये राडा, ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरात २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यासाठी एक हजार २३० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. येत्या मार्च पर्यंत ही कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे काही कंत्राटदार घाई करताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळले आहे.

महापालिकेने कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा निर्धार केला आहे. या कामांचे  महापालिकेच्या बांधकाम विभागासह सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट तसेच गुणवत्ता विभाग अशा चार स्तरीय तपासण्या केल्या जात आहेत.

गंजमाळ सिग्नल ते आयटीआय सातपूर पर्यंतचा रस्ता मेसर्स अजमेरा कन्स्ट्रक्शन्स यांना देण्यात आला आहे. त्यात निकृष्ट रस्ता आणि सिमेंट ऐवजी राखेचा प्रमाण अपेक्षा अधिक वापर असल्याच्या तक्रारी होत्या. 

महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि शहरा अभियंता अग्रवाल अन्य अधिकाऱ्यांसह बुधवारी गुणवत्ता तपासणीसाठी थेट रस्त्यावर उतरले होते. त्यांनी कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी केली. यावेळी नियमितपणे पाहणी करून गुणवत्ता नसल्यास कंत्राटदारांना गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आल्या आहे. मालिका आयुक्त खत्री यासंदर्भात सक्रिय झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com