BJP Politics News: भाजप उमेदवारांच्या एबी फॉर्म चा गोंधळ चर्चेत आहे. यावरून निष्ठावंत आणि उमेदवारीसाठी पक्षात आलेल्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. सिडकोमध्ये यावरूनच स्वपक्षाच्याच उमेदवाराला भाजप नेत्यांकडून आव्हान देण्याचा प्रकार घडला.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी झाली. यामध्ये भाजपचे बहुचर्चित उमेदवार माजी नगरसेवक मुकेश सहाने यांचा अर्ज बाद झाला. एबी फॉर्म एकाच वेळी दोघांनी सादर केल्याने शहाणे यांची संधी हुकली.
भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना ठाकरे पक्षातून आलेले माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. श्री बडगुजर यांच्या पत्नी हर्ष बडगुजर यांना प्रभाग २५ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. ठिकाणी श्री बडगुजर यांच्या चिरंजीव दीपक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना देखील पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. भाजपच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते. एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर त्यांच्या आधीच एबी फॉर्मसह श्री बडगुजर यांच्या कुटुंबातून उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. छाननीत शहाणे यांचा अर्ज बाद झाला.
यावरून शहरात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाला. शहराध्यक्ष सुनील केदार यांना खुलासा करावा लागला. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देखील दिले. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. उमेदवार शहाणे यांचा अर्ज बाद झाला.
यावरून आता वादाची ठिणगी पडली आहे. माजी नगरसेवक शहाणे यांनी आपण पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपल्या विरोधात षडयंत्र करण्यात आले आहे. यामागे पक्षात आलेल्या नव्या लोकांचा सहभाग आहे, असा आरोप केला.
आपली उमेदवारी रद्द झाली असली तरी आपण पक्षातच राहणार आहोत. मात्र विधानसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करून दाखवू, असे आव्हान त्यांनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.
भाजपच्या एबी फॉर्मचा गोंधळ गेले दोन दिवस चर्चेत आहे. त्याच प्रभागात भाजपच्या पल्लवी गणोरे आणि सुरेखा नेरकर या दोघींना एबी फॉर्म देण्यात आला. यामध्ये श्रीमती गणवर यांनी आधी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरला. विविध प्रभागांमध्ये आता यावरून नवाब सुरू झाला आहे. अनेकांना एकापेक्षा अधिक एबी फॉर्म देण्यात आले आहेत. मुळे काही एबी फॉर्म गहाळ झाले किंवा चोरीला गेले असा संशय आहे.
प्रभाग २६ मध्ये देखील माजी नगरसेविका अलका अहिरे यांच्या जागेवर दोन एबी फॉर्म देण्यात आले. त्यामध्ये श्रीमती अहिरे यांनी आधी अर्ज केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला. कालचा छाननी चा दिवस शहरभर या वादाने चर्चेत होता. भाजप बरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे आणि अन्य पक्षात देखील एबी फॉर्मचा वाद रंगला होता. या वादातून आता अधिकृत उमेदवारांविरुद्ध त्यांच्याच पक्षाच्या संधी हुकलेल्या नेत्यांनी हाकारे पिटण्यास सुरुवात केली आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.